Hingoli  Crime News : हिंगोलीतील पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार केलेल्या प्रकरणातील सासूचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात याआधी पत्नी मेहुण्याचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. तर मेहुण्याचा काल मृत्यू झाला होता. यानंतर आता आज सासूचाही मृत्यू झाला आहे.  


नेमकं प्रकरण काय?


हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या विलास मोकाडे याने घटस्फोटाच्या कारणावरून पोलीस ठाण्यातून सरकारी पिस्तूल चोरली होती. त्यानंतर तो हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात असलेल्या सासुरवाडीत गेला होता. तिथे त्याने पत्नी मयुरी मोकाडे, सासू वंदना धनवे आणि मेहुना योगेश धनवे आणि स्वतःचा मुलगा श्रेयश मुकाडे यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता, त्यानंतर काल मेव्हणा योगेश धनवे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आज सासू वंदना धनवे यांचाही उपचारात दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं या गोळीबार प्रकरणातील मृत्यूची संख्या 3 वर पोहोचली आहे. 


सततच्या भांडणामुळे घटस्फोट घेण्याच्या मुद्द्यावरुन झाला होता वाद


हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात विलास मुकाडे याचे सासू-सासरे कुटुंबासह वास्तव्यास होते. तिथे विलास मुकाडे याची पत्नीदेखील गेली होती. सततच्या भांडणामुळे घटस्फोट घेण्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्याच वादातून हिंगोली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या विलास मुकाडे याने कुटुंबीयांवर गोळीबार केला. आरोपी विकास मुकाडे याने चार राऊंड फायर केले होते. घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या.


महत्वाच्या बातम्या:


Hingoli Firing : पोलीस कर्मचाऱ्याचा रागात कुटुंबावर गोळीबार; पत्नीनंतर मेव्हण्याचा उपचारादरम्यान मृत्यू