Turmeric Research Centre : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हळद (Turmeric) पिकाचे उत्पादन घेतलं जाते. सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेणार जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळं हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र (Balasaheb Thackeray Turmeric Research Centre) उभारले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे.  या संशोधन केंद्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचे अंदाजपत्रक देखील तयार करण्यात आले असून, 10 कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षात उपलब्ध होणार आहे.
 
महाविकास आघाडी सरकारनं 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता शिंदे सरकार स्थापन होताच या संशोधन केंद्रासंदर्भात शासन निर्णय करण्यात आला आहे. 14 सप्टेंबला हा शासानिर्णय काढण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षांमध्ये दहा कोटी रुपये निधी वितरित करत असल्याची माहिती या शासन निर्णयात आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हे हळद संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र या नावाने हे संशोधनं केंद्र उभारले जाणार आहे.


भारतीय हळदीला जगभरात मागणी 


भारतीय हळदीला  जगभरातून मागणी वाढत आहे. यंदा देशातून हळदीची विक्रमी निर्यात (export) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा देशातून 2 लाख टन हळदीच्या निर्यात होण्याची शक्यता आहे. भारतीय हळदीला सध्या जगभरातून मागणी वाढली आहे. गेल्या तीन वर्षापासून हळद निर्यातीत भारताचे आकडे वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोना काळात बाजारपेठा बंद असतानाही देशातून हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली होती. त्यामुळं हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही अच्छे दिन आले आहेत. गेल्या वर्षी देशातून 1 लाख 83 हजार 868 टन हळदीची निर्यात झाली होती.  यावर्षी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा वर्ष अखेपर्यंत दोन लाख टनांहून अधिक हळदीची निर्यात शक्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


तीन वर्षापासून हळदीच्या निर्यातीत वाढ


हळदीची यंदा दोन लाख टन निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नव्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. औषध म्हणून हळदीचे महत्त्व लक्षात आल्यामुळं हळदीची निर्यात यंदा विक्रमी म्हणजे दोन लाख टनांहून अधिक होणार आहे. भारतातून गेल्या तीन वर्षांपासून हळदीच्या निर्यातीत सतत वाढ होत आहे. कोरोना काळात हळदीचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग अनेक राष्ट्रांमध्ये नव्याने होऊ लागला. औषध म्हणून हळदीचे महत्त्व लक्षात आल्यामुळे हळदीची निर्यात यंदा विक्रमी म्हणजे दोन लाख टनांहून अधिक होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: