Hingoli News : इंधन (Fuel) बचत करण्याच्या उद्देशाने घाटात उतारावरुन न्यूट्रल गिअरमध्ये (Neutral Gear) गाडी चालवणाऱ्या चालकांना आता पाच हजार रुपयांचा दंड (Fine) बसणार आहे. उतारावरुन मोटार गाडी चालवत असताना न्यूट्रल गिअरवर चालवली तर समोरुन येणाऱ्या वाहनांसाठी धोका निर्माण होत असतो, परिणामी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे केंद्रीय रस्ते मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.


इंधनाचे भाव वाढल्याने घाटातील उतारावर बहुतांश वाहन चालक हे गाडी न्यूट्रल गिअरमध्ये किंवा बंद करुन वाहन चालवतात. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाच्या वतीने दंडात्मक कारवाईची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.


मोटार वाहन संदर्भात या नवीन कारवाईची नियमावली काय आहे ते पाहूया


1. घाटातील उतारावर वाहने जर न्यूट्रल गिअरमध्ये किंवा बंद करुन चालवली तर दंडात्मक कारवाई होऊ शकते 


2. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना पहिल्या वेळेस एक हजार रुपये दंड आणि तीन महिन्यासाठी परवाना रद्द केला जाऊ शकतो.


3. दुसऱ्यांदा हाच गुन्हा केला तर तीन हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही केली जाऊ शकते. 


4. जर चारचाकी किंवा त्यापेक्षा अधिक जड अवजड वाहनांनी घाटातून प्रवास करताना हा नियम मोडला तर दंड जास्त आहे. 


5. पहिल्या वेळेस या वाहनांना दोन हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना रद्द आणि दुसऱ्या वेळेस हाच गुन्हा केल्यास 5 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.


उतारावर न्यूट्रल गिअरमध्ये गाडी चालवणं आणि गिअरमध्ये गाडी चालवल्यास काय होतं?
जेव्हा आपण न्यूट्रल गिअर टाकून उतारावर गाडी चालवतो, तेव्हा वाहनाचं इंजिन आणि चाकं डिस्कनेक्ट होतात. कारण वाहनाला चाकांमधून आवश्यक असलेली रोटेशनल पॉवर मिळत नसल्यामुळे इंजिनाला कमी प्रमाणात इंधन मिळतं. तर जेव्हा आपण उतारावर गिअरमध्ये वाहन चालवतो तेव्हा गाडीच्या इंजिन ईसीयूला समजतं की एक्सलेरेटर सुरु नाही आणि इंधन इंजेक्टरमध्ये इंधन कमी प्रमाणात जातं. उतारावर गिअरमध्ये गाडी चालवताना एकतर इंधन लागत किंवा कमी लागतं.


घाटात झालेल्या आपघतात बहुतांश अपघात हे न्यूट्रल गिअरमध्ये वाहन चालवणे आणि गाडी बंद करुन चालवल्याने झाले आहेत. त्यामुळे हे अपघात रोखले जावे यासाठी नवीन मोटार वाहन कायदा डिसेंबर 2021 मध्ये लागू केला आहे.