हिंगोली : आफताब आणि श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder)  प्रकरण ताजं असतानाच असाच एक प्रकार हिंगोलीत समोर आलाय. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं आपल्याच पार्टनरला धर्मांतर करण्यासाठी धमकी दिल्याचं समोर आलंय. धर्मांतर न केल्यास जीवे मारेन अशी धमकी आरोपीनं दिल्याची तक्रार तरुणीनं दिली आहे... तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. हिंगोलीचा बाळापूरमध्ये ही घटना घडलेय.


हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे दोन महिन्यापासून शपथ पत्र तयार करून पीडित तरूणी आणि आरोपी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. दोन महिन्यांपूर्वी संबंधित आरोपी साजिद पठाण यांनी संबंधित मुलीला फुस लावून पळवून नेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला. अत्याचारानंतर  लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा  शपथ पत्रावर करार केला. करारानंतर हे  पुढे हे कपल दोन महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर पीडित मुलीने लग्नासाठी मागणी केल्यावर आरोपी असलेला साजिद खान पठाण याने पीडित मुलीला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला.  पीडित मुलीने धर्मांतरासाठी विरोध केल्याने त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली.  त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसात तक्रार  केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.


 मुंबईत वादानंतर प्रेयसीला इमारतीच्या टाकीवरुन ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न


 मुंबई  पश्चिम उपनगरातील दहिसर भागात देखील प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दहिसर पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमेय दरेकर (वय 25 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचं नाव असून तो बोरीवली भागात वास्तव्य करत आहे. तर संबंधित तरुणी ही कॉल सेंटरमध्ये काम करते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमेय दरेकर आणि जखमी झालेली तरुणी प्रियांगी सिंह (वय 24 वर्षे) हे दोघेही एकमेकांचे परिचित असून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. रविवारी (13 नोव्हेंबर) रात्री प्रियांगी आपला प्रियकर अमेय दरेकरला भेटण्यासाठी बोरीवली इथल्या त्याच्या निवासस्थानी गेली. तिथे त्यांच्यात काही वाद झाले. यानंतर संतापलेल्या अमेय दरेकरने प्रियांगीला इमारतीच्या टाकीवरुन धक्का मारुन ढकललं. यामुळे अंदाजे 18 फूट खाली पडल्यामुळे तिला गंभीर इजा झाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :