हिंगोली : जिल्ह्यातून भीषण अपघाताची (Accident) बातमी समोर येत आहे. डिव्हायडरला कार धडकल्याने हा अपघात झाला असल्याचे समोर येत आहे. तर या अपघातात शिक्षक पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे. तर त्यांचा मुलगा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची महिती मिळत आहे. तर, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 


आज (3 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील शिवनी फाट्याजवळ एक कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. कारचा हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर कारने तीन-चार पलटी घेत रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली होती. या अपघातामध्ये कारमध्ये असलेले शिक्षक पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. तर कार चालवत असलेला त्यांच्या मुलाला गंभीर मार लागला आहे. जयप्रकाश कावरखे आणि मंजुषा कावरखे असे मयत शिक्षक पती पत्नीचे नावं आहे. तर पराग कावरखे असे जखमी मुलाचे नाव आहे. 


शिक्षक पती पत्नी आणि त्यांचा मुलगा तिघेजण या कारमधून प्रवास करत होते. नांदेडहून कळमनुरीच्या दिशेने ते येत होते. दरम्यान, कळमनुरी जवळ कारचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्ता दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातामध्ये कार दोन ते तीन वेळा पलटी मारत रस्त्याच्या 100 फूट बाजूला जात पडली. या अपघातामध्ये पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मुलाला नांदेड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


कारने तीन-चार पलटी घेतली...


हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील शिवनी फाट्याजवळ एक कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त कारने अक्षरशः तीन-चार पलटी घेतली. नांदेडहून कळमनुरीच्या दिशेने जाणारी या कारचा वेग अधिक होता. त्यामुळे नियंत्रण सुटल्यावर ती थेट डिव्हायडरवर जाऊन धडकली. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. तयर गाडीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  


नागरिक मदतीला धावून आले...


कळमनुरी तालुक्यातील शिवनी फाट्याजवळ आज सकाळी अपघात झाला. कार डिव्हायडरवरला जाऊन धडकल्याने मोठा आवाज आला. त्यामुळे परिसरात असलेल्या नागरिकांनी आणि इतर वाहनधारकांनी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्त यांना मदत केली. तसेच, जखमी तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांना देखील याची माहिती देण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Worli Police : माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या मुलाच्या गाडीचा अपघात, रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल