Car Accident Mumbai : माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्या 19 वर्षीय मुलाच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाविरुद्ध वरळी पोलिसांनी (Worli Police) रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मेहता यांचा मुलगा ताकषील नरेंद्र मेहता (Taksheel Narendra Mehta) याच्या LAMBORGHINI HURACAN COUPE MY15 कंपनीची कारचा (क्रमांक एम.एच. 04 एच.क्यु. 0711) वांद्रे वरळी सी-लिंकवर अपघात झाला. वांद्रेहून दक्षिण मुंबईला जाताना हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊस पडत असताना त्याची कार स्किड झाली आणि ती रस्त्यावरील बॅरिकेडवर आदळली. कारची एअर बॅग बाहेर येताच त्याच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. वरळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, ताकषील नरेंद्र मेहतावर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरळी पोलिसांनी त्याला नोटीस देऊन नंतर सोडून दिले आहे.


या अपघातात दुसरे कोणीही जखमी नाही


ताकषील मेहता याची मेडिकल देखील करण्यात आली. तो नशेत नसल्याचे निर्दशनास आले. कार ही भरवाद वेगाने होती. त्यामुळं रस्त्याच्या बाजूस असलेल्या सुरक्षा कठड्यास वेगाने धडक दिली. दरम्यान, या अपघातानंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik News : रात्रीची वेळ, ओव्हर स्पिडिंग जीवावर बेतणारं! नाशिक जिल्ह्यात सात महिन्यात 914 अपघात, 578 जणांचा मृत्यू