Cabinet Expansion : आम्हाला शब्द दिलाय, त्यामुळे मंत्रीपद मिळणारच; शिंदे गटाच्या 'या' आमदाराने पुन्हा दावा ठोकला
Cabinet Expansion : राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रीपदाच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.
Santosh Bangar On Cabinet Expansion: शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची अपेक्षा लावून बसले आहेत. दरम्यान असे असतानाच अजित पवारांनी (Ajit Pawar) सत्ताधारी शिवसेना-भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुसऱ्यांदा झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले आहेत. तर राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रीपदाच्या अपेक्षेवर पाणी फिरले. त्यातच आता लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात असून, ज्यात शिंदे गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. सोबतच शिंदे गटाचे अनेक आमदार आपल्याला संधी मिळणारच असा दावा करत आहे. ज्यात आता हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी पुन्हा मंत्रीपदावर दावा ठोकला आहे. आम्हाला शब्द दिलाय, त्यामुळे मंत्रीपद मिळणारच असे बांगर म्हणाले आहेत.
काय म्हणाले संतोष बांगर?
मंत्रिमंडळ विस्तारावर बोलतांना आमदार बांगर म्हणाले की, “आम्ही आजही सांगतो, आम्हाला ज्या पद्धतीने शब्द दिलेला होता, त्या शब्दाची पूर्तता होणारच आहे. पण मला यात असे वाटते की, अजित पवार यांना 9 मंत्रीपदे भेटलेले आहेत. यामध्ये शिवसेना आदेश पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जो आदेश दिला जाईल त्याचे पालन सर्वच आमदार करतील, असे आमदार बांगर म्हणाले.
हिंगोली जिल्ह्याला एक मंत्रीपद द्याव...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार हेमंत पाटील आणि आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती करणार आहे की, एक मंत्रीपद हिंगोली जिल्ह्याला दिले गेले पाहिजे. मग ते राज्यात असो किंवा केंद्रात असो, आम्हाला एक मंत्रीपद द्यावा अशी मागणी करणार आहे. हिंगोली जिल्हा मागसलेला जिल्हा असून, त्याला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं बांगर म्हणाले.
यामुळे अजित पवारांनी पाठींबा दिला...
दरम्यान पुढे बोलतांना आमदार बांगर म्हणाले की, येणाऱ्या काळात म्हणजेच या दोन-चार दिवसांमध्ये किंवा सभागृह चालू झाल्यावर त्या अधिवेशनाच्या काळात देखील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम पाहून त्याला प्रभावित होऊन मी शिवसेना-भाजपल पाठींबा दिल्याचं अजितदादा म्हणाले आहेत. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या कामच बोलबाला आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झोपतात की नाही असा अनेकांना प्रश्न पडला आहे. 18 तास काम करणारे असे मुख्यमंत्री आतापर्यंत झाला नाही आणि पुढेही होणार नसल्याचं बांगर म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: