एक्स्प्लोर

फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर

वर्ध्यातील सेलू तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क बाईकवर वापरलं जाणारं हेल्मेट कीटकनाशक फवारणीवेळी वापरलं आहे. जेणेकरुन विषबाधा रोखता येईल.

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन 30 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे शेतमजुरांनी शेताकडे पाठ फिरवली होती. मात्र वर्ध्यातील शेतकऱ्यांनी यावर उपाय म्हणून अजब फंडा अवलंबला आहे. वर्ध्यातील सेलू तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क बाईकवर वापरलं जाणारं हेल्मेट कीटकनाशक फवारणीवेळी वापरलं आहे. जेणेकरुन विषबाधा रोखता येईल. वृषाल पाटील, प्रयोगशील शेतकरी वृषाल पाटील, प्रयोगशील शेतकरी कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, यामुळे शेतीत काम करण्यास मजूर मिळणंही मुश्किल झालं होतं. मात्र सेलू तालुक्यातील या शेतकऱ्याच्या हेल्मेट प्रयोगामुळे शेतमजूरही मिळू लागले आहेत. वृषाल पाटील असे या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव आहे. वृषाल पाटील हा युवा शेतकरी शेतीत नेहमीच नव-नवीन प्रयोग करत असतो. असाच प्रयोग या गाडीचा हेल्मेटच्या मदतीने केला आहे. फवारणी करताना उडणाऱ्या तुषारांमुळे अनेक शेतमजुरांना जीव गमवावा लागला. तर काहींना डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली. हेल्मेटच्या सहाय्याने फवारणी केल्यास या सर्व गोष्टींपासून आपला बचाव होतो, असे वृषाल पाटील यांचे म्हणणे आहे. हेल्मेट प्रयोगाचा फायदा आता मजुरांना होत असल्याने त्यांनीही पुन्हा शेतीची वाट धरली आहे. थोडा त्रास होत आहे, पण 300 रुपये मजुरी मिळत असताना विषबाधा झाल्यावर होणारा 500 ते 700 रुपयांच्या आर्थिक फटक्यापासून रक्षण होतंय. शिवाय आरोग्याला होणारी हानीही थांबली आहे. फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर भीतीच्या वातावरण निर्माण झाल्याने अनेक मजुरांना घरात बसण्याची वेळ आली होती. पण आता हा प्रयोग फायद्याचा ठरत असल्याने इतर शेतकऱ्यांकडे मजूर आता हेल्मेटची मागणी करत आहेत. फवारणीचा त्रास झाल्यास त्याचा थेट परिणाम नाक, डोळे आणि तोंडाला होता. आणि हेल्मेटमुळे याच अवयवांचं रक्षण करणं सहज सोपं होतं. आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून बियांना आणि औषधी विक्रेत्यांनी खरेदीवर इतर वस्तू देण्यापेक्षा फवारणी करताना विषबाधा होऊ नये म्हणून एक किट स्वस्तात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी संजय बमनोटेंनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget