Health Tips : यकृत (Liver) हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. यकृतामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. आहाराचे योग्य पचन झाल्यास आपणही निरोगी होतो. यासाठी जेवण नेहमी चांगले आणि स्वच्छ असावे असा सल्ला डॉक्टर देतात. बहुतेक लोकांमध्ये, बाहेरचे अन्न खाणे, दूषित पाणी पिणे यामुळे यकृतावर परिणाम होतो. काही वेळा मद्यपान केल्याने यकृताचंही नुकसान होत.. लिव्हर कॅन्सर, लिव्हर सिरोसिससारखे आजारही होतात. इतर रोगांप्रमाणे, यकृत देखील संकेत देते. हिपॅटायटीस बी हा देखील यकृताचा एक गंभीर आजार आहे. प्रतिबंध आणि वेळेवर उपचारांसाठी फक्त ती लक्षणे ओळखणे आवश्यक आहे. यकृताच्या 6 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये.
1. ताप, सांधेदुखी होऊ शकते
यकृताची लागण होताच हिपॅटायटीस हा सामान्य आजार आहे. त्यामुळे यकृताला सूज येते. यामध्ये सौम्य तापासारखी लक्षणे दिसू शकतात. तापमान वाढीबरोबरच थकवा, डोकेदुखी आणि सांधेदुखीही होते. पण, लक्षात घ्या की ताप इतर अनेक कारणांमुळे देखील होऊ शकतो आणि याचा अर्थ हिपॅटायटीस बी असा होत नाही.
2. लघवीचा रंग गडद पिवळा असू शकतो
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हिपॅटायटीस बी ची लागण झालेल्या लोकांच्या लघवीचा रंग गडद पिवळा असू शकतो. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे.
3. उलट्या आणि भूक न लागणे
हिपॅटायटीस बी ची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये उलट्या आणि भूक न लागणे देखील समाविष्ट आहे. त्यांच्या यकृतामध्ये सूज दिसून येते. यकृत नीट कार्य करू शकत नाही. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे दिसू शकतात. उलट्या होणे, भूक न लागणे, चक्कर येणे कालांतराने अशी लक्षणं दिसू लागतात.
4. शरीराचा रंग पिवळा होऊ शकतो
सूज आणि इतर संक्रमणांमुळे, बिलीरुबिन वाढू लागते. यामुळे कावीळ होते. बिलीरुबिन हे रक्तातील एक रसायन आहे ज्यामुळे त्वचा पिवळी होऊ शकते. त्यामुळे डोळे आणि त्वचा पिवळी दिसते. हिपॅटायटीस बी आणि कावीळ यांच्यात फरक ओळखण्यासाठी याची चाचणी करून उपचार करून घेणे गरजेचे आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :