Best Time To Drink Milk : दुधात असलेले पोषक घटक आपले शरीर मजबूत करतात. दूध हाडांसाठी सर्वात फायदेशीर आहे, कारण त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत दूध आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात दूध महत्त्वाची भूमिका बजावतं. बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात दूध पिऊनच करतात, तर काही लोक त्यांच्या दिनचर्येनुसार दुधाचं सेवन करतात, मात्र, दूध पिण्याची एक वेळ असते आणि त्या वेळेत जर दूध प्यायलात तरच त्याचा फायदा होतो हे तुम्हाला माहित आहे का? एखाद्या गोष्टीचे योग्य वेळी सेवन केले नाही तर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. आयुर्वेदानुसार कोणतीही गोष्ट वापरण्याची एक वेळ असते. यामध्ये दूध पिण्याची योग्य वेळ (Best Time To Drink Milk) देखील सांगण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 
 
रिकाम्या पोटी दुधाचं सेवन हानिकारक :


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी कधीही दुधाचे सेवन केल्याने तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतो. अशा परिस्थितीत ज्या लोकांना आधीच पचनाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी काही खाल्ल्यानंतरच दूध प्यावे. मात्र, लहान मुलांच्या बाबतीत असे होत नाही, लहान मुलं दिवसातून कधीही दूध पिऊ शकतात. ज्येष्ठांनी सकाळी दुधाचे सेवन करू नये.


फक्त रात्री दूध प्या


1. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वृद्ध व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी दुधाचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच अनेक आजारांपासून आराम मिळतो. 
 
2. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या असेल तर रात्री फक्त दूध प्या. याचा फायदा तुम्हाला मिळेल. एक ग्लास कोमट दूध तुमचा दिवसभराचा थकवा दूर करेल. तसेच तुम्हाला चांगली आणि गाढ झोप लागेल. 
 
3. आयुर्वेदात रात्री दूध पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. मात्र, दुपारच्या वेळीही तुम्ही दूध पिऊ शकता. तर, दुधात हळद मिसळून पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल