Green Chillies For Weight Loss : आपल्यापैकी अनेकांना झणझणीत आणि तिखट जेवण खायला आवडतं. आपल्या देशात बहुतांश लोकांना जेवणात मसालेदार आणि तिखट पदार्थ खायला आवडतं. आपण बनवलेल्या जेवणाला जो तिखटपणा येतो तो हिरव्या मिरच्यामुळे. तुम्ही एखादी भाजी बनवत असाल किंवा खिचडी बनवत असाल, तर त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्याने (Green Chillies) जेवणाची चव वाढेल. बहुतांश लोकांना हिरव्या मिरच्यापासून भरपूर पोषकतत्वे मिळतात, हे माहितीच नसतं. हिरव्या मिरच्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे तुमचं वजन वेगाने घटण्यास (Weight Loss) मदत मिळते. हिरव्या मिरच्यामध्ये बी-6, विटामिन- ए, आयर्न, पोटॅशियम आणि कॉपर यासारखी पोषण तत्वे आढळून येतात. 


हिरव्या मिरच्या खाल्ल्यामुळे मिळतात अनेक फायदे 


1. हृदयाचं आरोग्य अबाधित राहतं 


हिरव्या मिरच्या खाल्ल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडच्या पातळीला कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. यामुळे हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. तसेच, रक्तदाब आणि आणि हृदयाचं वेगाने धडधडणं कमी होण्यास मदत मिळते. हिरव्या मिरच्यामुळे खाल्ल्यामुळे फायब्रिनोलिटिक अॅक्टिव्हिटी वाढते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत असतील, तर त्याला प्रतिबंध करते. 


2. पचनासाठी असतं चांगलं


तुमच्या नियमित आहारात ज्या हिरव्या मिरच्यांचा समावेश करता त्यामध्ये फायबरचं भरपूर असतं. यामुळे कोलोन क्लीनिंग थेरेपीसारखं काम करतं आणि नियमितपणे कोणत्याही अडचणीशिवाय शौचास मदत होते.


3. केसांसाठी आहे चांगल 


हिरव्या मिरच्यांना नैसर्गिक सिलिकॉनचा चांगला सोर्स असल्याचं मानलं जातं. यामुळे तुमच्या टाळू आणि केसांच्या मुळांमध्ये रक्त प्रवाह वाढण्यास मदत मिळते. तसेच, केसांची वाढ होण्यासही मदत मिळते.


4. चमकदार त्वचा 


हिरव्या मिरच्यामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट विटामिन-सी भरपूर असतं. यामुळे शरीरातील कोलेजन वाढते आणि तुमची त्वचाही निरोगी राहते. हिरव्या मिरच्यांमध्ये उपलब्ध असणारे विटामिन-ई हे नैसर्गिक तेल निर्मिती करतं. यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगल राहण्यास मदत मिळते. तसेच, चेहेऱ्यावरील पिंपल्स, पुरळ, डाग आणि सुरकुत्यांना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं.


हिरव्या मिरच्यांमुळे वजन घटण्यास मदत मिळू शकते का?


हिरव्या मिरच्यांमध्ये भरपूर पोषणतत्वे मिळतात. त्यामुळे हिरव्या मिरच्यांशी संबंधित उपलब्ध पुरावे सांगतात की, या मिरच्या खाल्ल्यामुळे तुमचं वेगाने वजन घटण्यास मदत मिळू शकते. हिरव्या मिरच्यामध्ये कॅप्साइसिनचं प्रमाण आढळून येतं. यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढण्यास आणि भूक कमी करण्यासाठी मोठी मदत मिळू शकते. याच कारणामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी होतात आणि वजन कमी कमी होतं जातं. परंतु, यावर आणखीन संशोधन करण्याची आवश्यकता आहे. 


हिरव्या मिरच्याशी संबंधित काही धोके?


तुम्ही हिरव्या मिरच्या आहारातून खात असताना काही पथ्ये पाळणं आवश्यक आहे. प्रमाणाबाहेर मिरच्यांचं सेवन करु नका. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. जर तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असेल, तर हिरव्या मिरच्यांचं जास्त प्रमाणात सेवन करु नका. याचं कारण असं आहे की, प्रमाणाबाहेर मिरच्या खाल्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनलची समस्या होऊ शकते. यामध्ये अपचनाशी संबंधित समस्या  निर्माण होते. जसे की, मळमळ होणं आणि अतिसार होणं इत्यादी.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)