CSK vs KKR Match Preview: चार वेळचा आयपीएल चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात आज आयपीएलचा 61वा सामना रंगणार आहे. चेन्नई प्लेऑफमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी मैदानात उतरेल. चेन्नईचा संघ 12 सामन्यांमध्ये 15 गुणांसह प्लेऑफमध्ये जाण्याच्या तयारी आहे. तर दुसरीकडे केकेआर केवळ 10 गुणांसह उर्वरित दोन सामने जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी केकेआरला इतर संघांच्या कामगिरीकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. 


हेड टू हेड 


महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघ यापूर्वीचे सलग दोन सामने जिंकून आजच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणं केकेआरसाठी सोपं नसेल. धोनीचे दोन षटकार चेपॉक स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांचा आनंद साजरा करण्यासाठी पुरेसे असतील, जसे धोनीनं दिल्लीविरुद्धच्या सामन्यात लगावले होते जे सामना जिंकण्यासाठी निर्णायक ठरले.


सीएसकेची फलंदाजांची फळी अत्यंत मजबूत आहे. न्यूझीलंडचा सलामी फलंदाज डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड संघासाठी लकी ठरत असून ते संघाला नेहमीच चांगली सुरुवात करुन देत असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सीएसकेच्या फळीत अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबेचा नंबर लागतो. आतापर्यंत हे चौघेही संघासाठी तारणहार ठरले आहेत. मोईन अली, रविंद्र जाडेजा आणि अंबाती रायडू यांच्यासारखे फलंदाज मात्र आतापर्यंत संघासाठी फारशी चांगली खेळी करु शकले नाहीत. 


गोलंदाजीत श्रीलंकेचा मथिशा पाथिराना संघासाठी ट्रम्प कार्ड ठरला आहे. जाडेजा, मोईन अली आणि महेश तीक्ष्णा आपल्या फिरकीत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अडकवण्यात यशस्वी होत आहेत. या सामन्यात केकेआरचा विजय फिरकीपटूंच्या कामगिरीवर अवलंबून असेल. वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा रविवारी कशी कामगिरी करतात, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. अनुभवी सुनील नरेन या मोसमात आतापर्यंत अपयशी ठरला असून तो आजच्या सामन्यात नक्कीच पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.


कर्णधार नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी चांगली फलंदाजी केली आहे, पण केकेआरला त्यांच्या सलामीवीरांकडून चांगली सुरुवात होईल अशी आशा आहे. केकेआरच्या फलंदाजांना मात्र पथिरानाचे यॉर्कर्स आणि स्लो बॉल्स, जाडेजाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या गोलंदाजीपासून सावध राहावं लागेल.


चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे संभाव्य संघ : 


चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ 


एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), आकाश सिंह, मोइन अली, भगत वर्मा, दीपक चाहर, डेवोन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हँगरगेकर, रवींद्र जाडेजा, सिसंडा मगाला, अजय मंडल, मथीशा पथिराना , ड्वेन प्रीटोरियस, अजिंक्य रहाणे, शॅक रशीद, अंबाती रायडू, मिचेल सेंटनर, सुभ्रांशु सेनापती, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, बेन स्टोक्स, महेश तीक्ष्णा


कोलकाता नाईट रायडर्सचा संभाव्य संघ 


नीतीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंह, एन जगदीसन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेविड वीज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंह, आर्या देसाई आणि जॉनसन चार्ल्स