एक्स्प्लोर

ग्रामदेवता : सेलूवासियांचं ग्रामदैवत श्री सिद्धीविनायक

  वर्धा : ग्रामदैवत म्हटलं की गावातील प्रत्येक घरात त्याला अनन्यसाधारण महत्व असतं. सिद्धीविनायक म्हणजेच गणपती हिंदू धर्मात प्रथमपूजेचा मान असणारं दैवत आहे. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करायची झाली तर पहिला मान गणपतीचा असतो. अग्रपूजाधारी सिद्धीविनायक वर्ध्याच्या सेलुकरांचं केळझर इथं वसलेलं ग्रामदैवत आहे. सेलूच्या सिद्धीविनायकाची आख्यायिका वशिष्ठ ऋषी याठिकाणी वास्तव्यास असताना पूजाअर्चा करण्यासाठी सिद्धिविनायकाची स्थापना केल्याचं सांगितलं जातं. तसंच कुंतीपुत्र भीमाने एकचक्र नगरात अज्ञातवासात असताना याच ठिकाणी बकासुराचा वध केल्याचं सांगितलं जातं. तसंच भोसले घराणं कोल्हापूरवरुन नागपूरला स्थलांतरीत होत असताना येथे मुक्काम केल्याचं सुद्धा सांगण्यात येतं. निसर्गरम्य परीसरात मंदिर मंदिराचा संपूर्ण परिसर हा डोंगर टेकड्यांचा आहे. मधोमध असलेल्या टेकडीवर हे गणेशाचं मंदिर आहे. वर्धा-नागपूर राज्यमार्गावरील केळझरच्या या गणेशाला हजारो वर्षाचा इतिहास असल्याचं बोललं जातं. त्यामुळे लोकांची श्रद्धा अधिक आहे. दूरवरुन मंदिराचा कळस डोळ्यात भरतो. साधारणपणे सोळा एकराचा हा परिसर आहे. इथे गणेशाची शेंदुराची लोभस मूर्ती आहे. मुर्तीची उंची चार फुट सहा इंच आहे, तर तिचा व्यास हा साधारण 14 फुटांचा आहे. मंदिरात चांदीचं सिंहासन असून मंदिराच जूनेपण टिकवलं गेलेलं नाही. हा परिसर मात्र शांत आणि रमणीय आहे. 1993 पासून इथलं व्यवस्थापन ट्रस्टच्या माध्यमातून चालवलं जात आहे. मंदिराचा जिर्णोद्धार करत असतांना पाण्याची गरज भासली तेव्हा मंदिर परिसरात उत्खनन करण्यात आलं. उत्खनन सुरु असतांना काही पुरातन मूर्ती आढळून आल्या. यात शंख आणि सुदर्शन चक्रधारी विष्णू सुद्धा आहे. महालक्ष्मीची मूर्ती सुद्धा उत्खननात मिळाली असून त्याची स्थापना करण्यात आली आहे. गणेशजयंतीला भव्य उत्सव याठिकाणी वर्षभरात गणेश जयंती निमित्त 7 दिवस पूजा आणि आरती सोहळा साजरा केला जातो. तसंच पौष महिन्यात काकड आरती आणि संकष्ट चतुर्थीला एक दिवसाची यात्रा सुद्धा असते. यात्रेवेळी गावातून दिंडी काढली जाते. दिंडीनंतर भंडारा आणि महाप्रसाद असतो. नागपूर-वर्धा मार्गावर असल्यानं यामार्गाने जाणारे प्रवासी दर्शनाचा मोह आवरु शकत नाहीत. मनातील इच्छा पूर्ती झाल्यास अन्नदान करत भंडारा केला जातो. संपूर्ण परिसर डोंगरात असल्यानं रमणीय आणि शांत वातावरण असतं. मंदिराच्या मागच्या बाजूला एका गणेश तलाव आहे. तिथे पक्ष्यांचा वावर असतो. नवीन सोयीसुविधा पर्यटन स्थळातील क दर्जा प्राप्त झाल्यानं शासनाचा निधी मिळू लागला आहे. पण याठिकाणचं भक्त निवास राहण्याजोग नाही. मंदिर परिसरात खालच्या बाजूला नवीन सभागृह बनविण्याच काम सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget