एक्स्प्लोर

ग्रामदेवता: गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी जालन्याचे राजूरेश्वर

जालना: जालना शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वासलेले राजूरेश्वराचे मंदिर म्हणजे जालनावासियांचे ग्रामदैवत. उंच टेकड्यांवर वसलेले बप्पाचे हे मंदिर गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून ओळखलं जाते. राजूरेश्वराला गणपतीचं नाभीस्थानही मानलं जातं. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला रोज अनेक गणेश भक्त आवर्जून हजेरी लावतात. मंदिराची रचना राजूरेश्वराचं हे मंदिर पूर्वाभिमुख असून, या मंदिराचा उल्लेख गणेश पुरणातही आढळतो. मंदिरात प्रवेश करताच मोठा सभामंडप आणि पुढे गर्भगृह आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला की, बाप्पांची स्वयंभू मूर्ती गणेशभक्तांचे मन मोहीत करते. सध्या, मंदिराचे  जीर्णोद्धाराचे काम सुरु असून मंदिराचा गाभा कायम ठेऊन नवीन बांधकाम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हे संपूर्ण मंदिर पांढऱ्या संगमवरी दगडात बांधण्यात येतं आहे. याच मंदिरात बाजूला शिव आणि अन्नपूर्णा देवीचे  मंदिर आहे. शिव मंदिराची कलाकुसर म्हणजे हेमाडपंथी वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. ऐतिहासिक महत्त्व प्रचीन भारतातील 16 समृद्ध आणि वैभवशाली शहरांपैकी जवळच असलेल्या भोगवर्धन अर्थात आजचे भोकरदन या शहराचा उल्लेख ही इतिहासात आढळतो. यादव काळानंतर पेशवाईत या मंदिराची लोकप्रियता चारीही दिशांना वाढत गेली. पेशव्यांचे आराध्य दैवत असल्याने पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराला भेट देऊन पंचधातूची घंटा गणरायाला अर्पण केली. आजदेखील ही घंटा येथे पहायला मिळते. अध्यात्मिक महत्त्व गणेश पुराणात याची एक आख्यायिका सांगितली जाते. वरणेश्वर नावाच्या राजाला अपत्य नसल्याने त्याने गणेशाची आराधना केली. राजाच्या भक्तीनं गणेश प्रसन्न झाले, आणि त्यांनी पुत्रप्राप्तीचा वर राजाला दिला. पुढे काही काळानंतर राजाला मुलगा झाला. मात्र हा मुलगा  कुरुप  असल्याने त्याला सांभाळणे राजाला अपमानाचे वाटू लागले. त्यामुळे त्याने आपल्या मुलाला येथीलच वनात सोडून दिले. नंतर या मुलाचा सांभाळ अगस्ती ऋषींनी केला. त्यांच्या देखरेखी खाली याने सर्व विद्येत शिक्षण घेतले. पुढे याच मुलाने आपला पराक्रम दाखवत सिंदूरासुराचा वध केला. यामुळे आपली चूक कळली आणि तो अगस्ती ऋषींना शरण गेला. यानंतर त्यांनी आपल्या मुलाला या गडावर आणलं आणि राज्याभिषेक केला. तो वरण्य राजाचा पुत्र म्हणजेच हा राजूरेशवर. राजूरेश्वराचा वार्षिक उत्सव संपूर्ण भारतात गणपतीची साडेतीन शक्ती पीठे आहेत. यात मोरेगाव, चिंचवड आणि राजूर हे पूर्ण तर पद्मालय हे अर्धे पीठ मानलं जातं. यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व आहे. माघ शुद्ध चतृर्थीला राजूर येथे गणेश जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम असतो. यावेळी प्रवचन कीर्तनासह विविध  धार्मिक कार्यक्रमे मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. यावेळी गणेश भक्तांनीही मोठी गर्दी केलेली असते. व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Fatima Sana - Shafali Verma : चल निघ येथून...! भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा ड्रामा; शेफालीच्या विकेटनंतर पाकिस्तानच्या कर्णधाराने नको ते केलं, नेमकं काय घडलं? VIDEO
चल निघ येथून...! भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा ड्रामा; शेफालीच्या विकेटनंतर पाकिस्तानच्या कर्णधाराने नको ते केलं, नेमकं काय घडलं? VIDEO
Omraje Nimbalkar: मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!
मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!
Vastu Shashtra: तुमच्या देवघरात देवांच्या मूर्ती, फोटो एकमेकांसमोर नाही ना? नेमक्या कशा ठेवाव्यात मूर्ती? वास्तुशास्त्रातील 'हे' नियम जाणून घ्या...
तुमच्या देवघरात देवांच्या मूर्ती, फोटो एकमेकांसमोर नाही ना? नेमक्या कशा ठेवाव्यात मूर्ती? वास्तुशास्त्रातील 'हे' नियम जाणून घ्या...

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
Embed widget