एक्स्प्लोर

ग्रामदेवता : पुण्यातील चिंचवडचं ग्रामदैवत श्री मोरया गणपती

पुणे : पुणे जिल्ह्याचं आध्यात्मिक महत्व रांजणगाव, मोरगाव, थेऊर या अष्टविनायक गणपती मंदिरांमुळे अधिक आहे. या अष्टविनायक गणपतीप्रमाणेच असंख्य गणेशभक्तांचं श्रद्धास्थान आहे ते चिंचवडमधील मोरया गणपतीचं. पवना नदीच्या तीरावर असलेलं हे मंदिर म्हणजे गणेश भक्तीची साक्ष देणारं स्थान. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी ही याच ठिकाणी आहे. ही उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. मोरया गोसावी यांनी या गणेशाची स्थापना केली. इ.स. 1655 मध्ये गोसावी यांनी जिवंत समाधी घेतली. त्यानंतर 1659 मध्ये त्यांच्या चिरंजीवांनी हे मंदिर उभारलं. मंदिराची बांधणी साधी दगडाची आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर एक सभामंडप लागतो. या प्रशस्त सभामंडपापासून आत गेल्यावर श्रीमोरया गोसावींची समाधी आहे. समाधीवरची मूर्ती द्विभुज गणपती सिद्धी बुद्धीसहित चिंतामणी महाराजांनी बसवलेली आहे. शेंदूर लेपून ही मूर्ती फार मोठी झाली होती. 1956 साली मूर्तीची खोळ पडली. आत काळ्या पाषाणाची घडवलेली अत्यंत सुबक मूर्ती निघाली. बाहेरच्या गाभाऱ्यात अर्जुनेश्वराची प्रचंड शाळुंका आहे. मोरया गोसावींच्या समाधीकडे जाण्याचा रस्ता तिथूनंच आहे, असं सांगितलं जातं. समर्थ रामदास, श्रीसंत तुकाराम महाराज हेही या स्थानाचे भक्त होते. गेल्या अनेक दशकांपासून भाद्रपद आणि माघ महिन्यात मंगलमूर्तीची यात्रा निघते. यामध्ये मोरयांची पालखी अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावच्या मोरेश्वर गणपतीच्या मंदिरात पायी जाते. येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी सोहळा होतो, तसंच प्रत्येक चतुर्थीला अथर्वशीर्षाचं पठण केलं जातं.  चतुर्थी दिवशी चंद्रोदयानंतर महाप्रसादाचं वाटप होतं. याव्यतिरिक्त अन्य छोटेखानी कार्यक्रमही येथे नेहमी होत असतात. ट्रस्टद्वारा वेद पाठशाळा चालवली जाते. या सर्व कार्यक्रमांचा खर्च संस्थानाकडून केला जातो. मोरया गणपती हे जागृत देवस्थान असल्यानं दूरवरून अबाल-वृद्ध याठिकाणी दर्शनाला येतात. त्यामुळे प्रत्येक चतुर्थीला इथल्या परिसराला जणू यात्रेचं स्वरूप येतं. हे बाप्पा नवसाला पावणारे असल्याची भावना सर्व गणेश भक्तांची आहे. त्यामुळं अनेक भक्त बाप्पाला वेगवेगळे नवस करतात. तसंच नवस पूर्ण झाल्याचंही दर्शनाला येणारे भाविक सांगतात. अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावच्या मोरेश्वरांच्या भेटीला मोरया गणपती हे वर्षातून दोनदा जातात. त्यामुळं मोरया बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर अष्टविनायक गणपतींपैकी एकाचे दर्शन झाल्याची भावना गणेश भक्त व्यक्त करतात. मंदिराचा पवना नदीकाठचा परिसर आणि बांधणी यामुळं इथं प्रसन्न वातावरण असतं. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मनातील क्लेश, त्रास आणि थकवा नाहीसा होत असल्यानं वृद्ध भक्त ही मोठी गर्दी करतात. रोज येऊन दर्शन घेणाऱ्यांसोबत एकादशी आणि विनायकीला देखील इथं भक्त मोठी गर्दी करतात. अष्टविनायक गणपतींपैकी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक या तीन मंदिरांच व्यवस्थापन चिंचवड देवस्थानकडून पाहिलं जात. त्यामुळं या अष्टविनायकांचं जेवढं महत्व आहे तेवढंच महत्त्व मोरया गणपतीला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Nana Patekar Death Marathi News: 'मेरा मन करता है की भगवान को ही मार डालू...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं राम गोपाल वर्मा कोलमडला!
'मेरा मन करता है की भगवान को ही मार डालू...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं राम गोपाल वर्मा कोलमडला!

व्हिडीओ

Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Embed widget