एक्स्प्लोर

ग्रामदेवता : आदिवासींचं कुलदैवत, बर्डीपाड्याची देवमोगरा देवी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या बर्डीपाडा इथली देवमोगरा देवी. विसरवाडी गावापासून 10 किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी रस्ताही नाही अशा ठिकाणी हे देवमोगरा मातेचं मंदिर उंच डोगरावर वसलेलं आहे. पायथ्यापासून 2 हजार 640 फूट अंतर पार करुन दर्शनाला जावं लागतं.  मंदिराच्या पायथ्यापासून सुरु होणाऱ्या पायऱ्यांपासून केलेला  कच्चा रस्ता आहे. गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील देवमोगरा मातेची ही प्रतिकृती बर्डीपाडा येथे पाहायला मिळते. आदिवासी भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला साकडं घालण्यासाठी या ठिकाणी येतात. कणी पूजन करुन कोलपासानगरीमध्ये बाहागोर्‍या, सिडगोवा, दोघा वजीर, खेका पुंजारा टुडा, बोडवाबाबा हेगवा, बाबा डुंगो, बाबा ढोडगा, बाबा आथवा, बाबा रोज्या, बाबा हाटा, बाबा खोगज्या, जांबु गोड, बाहा आंबाडा या दाब मंडल शिवारातील देव देवतांचे पूजन करतात. हे मंदिर जवळपास दीडशे वर्षांपूर्वीचं असल्याची आख्यायिका आहे. एका छोट्याशा घराप्रमाणे हे मंदिर पाहायला मिळतं. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातील मराठी माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतर येणार्‍या अमावस्येला म्हणजे महाशिवरात्रीला देवमोगराच्या मोगीची यात्रा भरते. या यात्रेसाठी आदिवासी बांधव पंधरा दिवसांपासून तयारीला लागतात. याहा मोगी ही आदिवासी समाजाची कुलदेवता असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या चारही राज्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात. Gramdevta_Nandurbar_Devmogara_Devi_1 देवमोगरा देवीच्या जन्माबाबत आदिवासी समाजात अनेक कथा सांगितल्या जातात. सातपुडयातील बागोर्‍या देवाच्या राज्यात बागोर्‍या देव जंगलात शिकारीला आणि कंदमुळे गोळा करायला गेले. तेव्हा त्यांना सिबलीच्या जाळीत बाबूंच्या जाळीत दाब गावाच्या गवतात एक लहान बाळ सापडलं. हे बाळ म्हणजे देवमोगरा देवी असं सांगितलं जातं. बागोर्‍या देवाने या बालिकेला आणून राणी देवी गांधार यांच्याकडे दिलं. त्याचवेळी त्यांच्याकडे एका मुलाचाही जन्म झाला होता. त्याचं नाव विन्या देव किंवा गांडा ठाकूर सांगितलं जातं आणि त्याला भाऊ म्हणून ओळखतात. देवमोगरा देवी तरुण झाल्यावर तिचं राजापानठा देवाशी लग्न होतं. राजापांठाच्या आईचं नांव उमरावाणू आहे. देवमोगरा देवीच्या आदिवासी भाषेत याहामोगी म्हणतात याहा म्हणजे आई असा अर्थ आहे. महादुष्काळात याहामोगीच्या या उदात्त आणि मानवतादी कार्यामुळेच त्यांना याहा, लोकमाता, कणी, कन्सरी आपली सर्व पालनहार संबोधून दैवत्व बहाल केलं. आदिवासी समाजाचे हे ग्रामदैवत असल्याने आजही इथल्या पूजा-विधी आदिवासी भाषेतच होतात. धान्य, वन भाजी, कोंबळा, भंगारची भाकर आणि मव्हाच मद्या (दारु) असा नैवेद्य देवीला दिला जातो. त्यामुळे आदिवासी भाषेतच मंदिराचे पुजारी देवीची महिती सांगतात. पहाडात आणि दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या या देवीकडे जाण्याकरता भाविकांना खडतर प्रवास करावा लागतो. येथेही सरकारी यंत्रणेची उदासीनता पाहायला मिळते. नवापूरमध्ये ग्रामदैवत असल्याने मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग सुखकर व्हावा, अशीच अपेक्षा आदिवासी बांधव करत आहेत. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik : मुख्यमंत्र्यांचा निर्णय आमच्यासाठी बंधनकारक, रिक्षा चालकांनी आता एका वर्षात मराठी शिकावं : प्रताप सरनाईक
मुख्यमंत्र्यांचा निर्णय आमच्यासाठी बंधनकारक, रिक्षा चालकांनी आता एका वर्षात मराठी शिकावं : प्रताप सरनाईक
Ind vs Sl 2nd Test Shubman Gill : विजयाच्या उंबरठ्यावर टीम इंडियाचा घात! कोलंबो कसोटी हातातून गेली; शुभमन गिलने सांगितलं नेमकं कुठे चुकलं?
विजयाच्या उंबरठ्यावर टीम इंडियाचा घात! कोलंबो कसोटी हातातून गेली; शुभमन गिलने सांगितलं नेमकं कुठे चुकलं?
अकोल्यात महायुतीत ठिणगी! हिवरखेडात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, पोलिस घटनास्थळी दाखल, नेमकं प्रकरण काय?
अकोल्यात महायुतीत ठिणगी! हिवरखेडात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, पोलिस घटनास्थळी दाखल, नेमकं प्रकरण काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
100-200 सोडून द्या, निवासी भागात तब्बल 300 किमीच्या स्पीडने पोर्शे कार चालवली, दुचाकीवाल्याना बाजूनं काय गेलं हेच कळंना, ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या, कार जप्त; तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल
100-200 सोडून द्या, निवासी भागात तब्बल 300 किमीच्या स्पीडने पोर्शे कार चालवली, दुचाकीवाल्याना बाजूनं काय गेलं हेच कळंना, ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या, कार जप्त; तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल
Mehboob Shaikh MPSC Exam: MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
Vijay Wadettiwar On Supriya Sule OBC Certificate: राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
Embed widget