एक्स्प्लोर

ग्रामदेवता: बुलडाण्यातील खामगावची श्री जगदंबा

बुलडाणा: एखाद्या गावावर ग्रामदेवतेची किती कृपा असावी, याचं उदाहरण म्हणजे खामगांव. घाटपुरीची श्रीजगदंबा माता हे खामगांवचं ग्रामदैवत. जगदंबा मातेची सदैव कृपा राहिल्यानंच खामगांवचा विकास झाला. येथे शांती आणि समृद्धी टिकून राहिली, अशी समस्त खामगांववासियांची श्रद्धा आहे. केवळ बुलडाणाच नाही, तर आजूबाजूच्या चार जिल्ह्यातल्या बहुतांश भाविकांची ही कुलदेवता. त्यामुळे भाविकांचा राबता इथं कायमच असतो. मंदिर परिसरात पाय ठेवताच मनाला अपार शांती मिळते, असा भाविकांचा अनुभव आहे. घाटपुरीतली ही जगदंबा माता जमिनीतून प्रकट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. शेकडो वर्षांपूर्वी येथील कास्तकार जानराव देशमुख यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम होत असताना मातेची मूर्ती सापडली. इथे असलेल्या एका मंदिरात तेव्हापासूनच माता विराजमान झाली. मातेची मूर्तीच्या कालखंडाचा उल्लेख कुठेही नसला तरीही मूर्ती फार पुरातन असल्याचे बोलले जाते. अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी देवी म्हणून घाटपुरीची ही माय पंचक्रोशीत नावाजली आहे. ग्रामदेवता: बुलडाण्यातील खामगावची श्री जगदंबा जानराव देशमुख यांना मातेची मूर्ती विहिरीच्या खोदकामात सापडली आणि त्यांनी मूर्तीची स्थापना मंदिरात केली. अर्थात त्यावेळी हा परिसर फार आडवळणाचा होता. दोन्ही बाजूला नदी वाहात होती आणि इथे यायला त्रासही बराच होता. पण हळूहळू मातेचा महिमा खामगावच नव्हे तर बुलडाणा जिल्हयात पोहचू लागला. परिणामी येथे आता एका विशाल आणि  भव्य मंदिर उभे आहे. मंदिरात वर्ष भर भाविकांचा राबता असतो. मात्र, नवरात्र काळात फार मोठी यात्रा येथे भरते तेव्ह लाखाहून अधिक भाविक इथं दर्शन घेतात. पहाटे चारपासून देवीच्या नित्यपूजेला सुरूवात होते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटेति कुष्मांडा, स्कंदमाता, काव्यासनी, कालरात्री, महागौरी, सिध्दीदात्री, जगदंबा अशी देवीची अवतारात्मक ९ नावे आहेत. जप, हवन, पूजा-अर्चा, रात्री जागरण, गरबा, कुमारी पूजन व नवचंडी हवन अशी आई जगदंबेची भक्त सेवा करतात. शेकडो कुटुंबे जगदंबा देवी प्रांगणात येऊन आपला नवस फेडतात. जगदंबा मातेच्या ट्रस्टने विविध समाजउपयोगी उपक्रम भक्तांसाठी उभारले आहेत. त्यात अत्यल्प दरात भक्तांना राहण्यासाठी इथे धर्मशाळेची व्यवस्था केली गेली आहे. त्याचप्रमाणे या धर्मशाळेचं सभागृह मंगल कार्यासाठी देखील अल्प दारात दिले जातात. इथे विनाशुल्क वैद्यकीय सेवा संस्थान तर्फे दिल्या  जातात.  दर मंगळवारी आणि शुक्रवारी ही वैद्यकीय सेवा दिली जाते. सध्यां लोप पावत चाललेली संस्कृती आणि वेदाची पुरातन व्यवस्था जपण्यासाठी ट्रस्टने सुरु केली आहे. इथे सनातन संस्कृतीचे शिक्षण देणारी वेदशाळा अगदी लहानपणीच वेद  अभ्यासक बालकांना इथे प्रवेश दिल्या जातो. इथे त्यांना पांडित्य, संस्कृत वेद पठण, धर्मशास्त्र आदींचा अभ्यासक्रम शिकवला जातो. एकूणच उद्योगनगरी आणि विदर्भाची कापसाची,चांदीची  सर्वात  मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या खामगावची नाळ जुळली आहे ही  घाटपुरीच्या जगदंबा आईशी. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : मॅन्युपुलेटिव आणि स्मार्ट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लॅग्वेजवरुनच ओळखतात मनातलं
मॅन्युपुलेटिव आणि स्मार्ट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लॅग्वेजवरुनच ओळखतात मनातलं
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Vinayak Raut: विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?
विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Embed widget