एक्स्प्लोर

सर्वाधिक तूर विकणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांची चौकशी!

मुंबई : ज्या शेतकऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केली आहे, त्यांचीच तूर खरेदी करण्यात येईल, असा निर्णय सरकारने घेतल्यानंतर जवळपास 5 दिवसांनी त्याचा जीआर निघाला. यानुसार सरकार केवळ 10 लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. 22 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्यात आलेली तूर एकूण अंदाजे 10 लाख क्विंटल एवढी आहे. त्यामुळे 10 लाख क्विंटल तुरीचाच शेवटचा दाणा खरेदी केला जाईल, हे स्पष्ट झालं आहे. शिवाय याच्या व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई आणि विदर्भ पणन महासंघ, नागपूर यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काय आहे शासन निर्णय?
  • तूर खरेदी योजनेची जबाबदारी, देखरेख आणि व्यवस्थापन याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई आणि विदर्भ पणन महासंघ, नागपूर यांची राहिल. त्यासाठी या संस्थांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • खरेदी केंद्रावरील शिल्लक तुरीचा पंचनामा करण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसिलदाराच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यवस्थापक, सबएजंट संस्था, पणन महासंघाचा प्रतिनिधी यांचा समावेश असलेली समिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नियुक्त करण्यात येईल.
  • तूर खरेदी केंद्रावर आलेल्या तुरीची नोंद असलेली नोंदवही या समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर तूर खरेदी करण्यात येईल.
  • या नोंदींनुसार 10 लाख क्विंटल तुरीची खरेदी केली जाईल. समन्वयाची जबाबदारी पणन संचालक, पुणे यांची असेल.
  • तूर खरेदी करताना शेतकऱ्याचा 7/12 उतारा, पीक पेरा पाहणीप्रमाणे तुरीची नोंद आहे का, याची खात्री केली जाईल. पीक पेऱ्यानुसार आणि कृषी विभागाने निश्चित केलेल्या हेक्टरी उत्पादनानुसार तूर खरेदी केली जाईल. त्यापूर्वी शेतकऱ्याला त्याने आणलेली तूर इतर कुठे विकली आहे का, याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. याची खात्री झाल्यानंतरच तूर खरेदी केली जाईल.
  • खरेदी केंद्रांशी जोडलेल्या गावातील शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाईल.
  • तुरीची रक्कम शेतकऱ्याच्या आधार कार्डशी संलग्नित असलेल्या बँक खात्यावर पाठवण्यात येईल.
  • सर्वात जास्त तूर विक्री केलेल्या पहिल्या एक हजार शेतकऱ्यांची यादी तयार करुन त्यांची एका आठवड्यात चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
संबंधित बातम्या :

तूर खरेदीसाठी सरकारच्या दोन नव्या अटी, शेतकरी संतप्त

शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!

सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय

काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक

तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च

तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना

नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा

महत्त्वाच्या बातम्या

Ashish Shelar : मनोज जरांगे यांचे आंदोलन अतर्क, आताताईपणा अन् अर्वाच्च भाषेचं, छत्रपतींना मानणारा...; मंत्री आशिष शेलार भडकले, मराठा समाजालाही आवाहन
मनोज जरांगे यांचे आंदोलन अतर्क, आताताईपणा अन् अर्वाच्च भाषेचं, छत्रपतींना मानणारा...; मंत्री आशिष शेलार भडकले, मराठा समाजालाही आवाहन
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Manoj Jarange Beed: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
Manoj Jarange Beed: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
Embed widget