Jungly Mushroom : सध्या गोंदियाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जंगली मशरुम (Jungly Mushroom) आले आहे. या जंगली मशरुमला मोठी मागणी असल्याचे चित्र दिसत आहे. प्रति किलो मशरुमसाठी 800 ते 1000 रुपयांचा दर मिळत आहे. मटनापेक्षाही महाग दरानं मशरुमची विक्री होत आहे. दरम्यान, मशरुमची खरेदी करण्यासाठी सध्या नागरिक देखील गर्दी करत आहेत. त्यामुळं या मशरुमच्या विक्रीतून लोक चांगल्या प्रकारची कमाई करत आहेत. जुलै महिन्यात मशरुमला मोठी मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.


नैसर्गिक पद्धतीनं मशरुम उगवते


पावसाची हजेरी लागताच गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरुम विक्रीसाठी आले आहे. सध्या या जंगली मशरुमला बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे दिसत आहे. सोबतच चांगला दर देखील मिळत असून 800 ते 1000 रुपयां प्रति किलोला दर मिळत आहे. सध्या बाजारात मशरुमची खरेदी करण्यासाठी मशरुम खवयी गर्दी करत आहेत. नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगले आहेत. या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागताच  जंगलीव्याप्त भागात नैसर्गिक पद्धतीनं हे मशरुम स्वतः उगवते. याची कुठेही लागवड केली जात नाही. नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर जंगलात गे उगवते. गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरुम खोदून आणतात. त्यानंतर मशरुम स्वच्छ पाण्यानं धुवून त्यावा विक्रीसाठी बाजारात घेऊन जातात. 




आरोग्यासाठी मशरुम चांगले


सध्या मशरुमचे उतपादन येणं सुरु झालं आहे. प्रति किलो मशरुमसाठी 800 ते 1000 रुपयांचा दर मिळत असल्यानं विक्रेत्यांना यापासून चांगला फायदा होत असल्याचं चित्र दिसत आहेत. मशरुम हे आरोग्याला पोषक असल्यानं डॉक्टर देखील पावसाळ्यात जंगली मशरुम खाण्याचा सल्ला देतात अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.




बांबू जंगलात मशरुमचं उत्पादन जास्त


पूर्व विदर्भातील जंगल परिसरात हे मशरुम मोठ्या प्रमाणावर उगवते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जंगलात हे मशरुम पाहायला मिळते. विशेषत: बांबू जंगलात याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. पावसाळा सुरु झाली की, मशरुम मोठ्या प्रमाणात उगवते. तसेच बाजारपेठेत देखील त्याला या काळात जास्त मागणी असते. श्रावण महिन्यात नागरिक मांसाहारी करत नाहीत. त्यामुळं या काळात मशरुमला मोठी मागमी असते. शरीरासाठी देखील मशरुम पोषक असते. आयुर्वेदात देखील मशरुमचे मोठे महत्व आहे. त्यामुलं बाजारात मशरुमला मोठी मागणी आहे.