गोंदिया: गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भूषण वाढोळकर (24) रा. चांदुर रेल्वे, जिल्हा अमरावती असे मृतक डॉक्टराचे नाव आहे. 


वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करणाऱ्या डॉक्टरने आत्महत्या केली आहे. भूषण याने 2018 मध्ये गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश केला होता. तर या वर्षी मध्ये त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले होते. 


वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक वर्षाकरिता इंटरशिप करत होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहातच तो सध्या राहत होता. दरम्यान रात्री उशिरा तो मित्रांशी गप्पा मारल्यानंतर आपल्या रूममध्ये गेला. मात्र सकाळी तो उशिरापर्यंत बाहेर न आल्याने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अन्य डॉक्टरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी भूषण हा गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. या घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह गोंदिया येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाकरिता आणला आहे.