Gondia : तांदूळ (Rice) उत्पादक शेतकऱ्यांचे (Farmers) पैसे थकल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेलं ठिय्या आंदोलन अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतलं आहे. चार सप्टेंबरपर्यंत तांदळाचे (Rice) पैसे मिळतील असं आश्वासन आमदार विनोद अग्रवाल (Vinod Agrawal) यांनी दिलं आहे. मुंबईला जाऊन या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे अग्रवाल म्हणाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. 
 
गोंदिया जिल्ह्यातील चुटिया येथील 433 शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील तांदळाच्या पिकाच्या थकीत पैशासाठी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं होतं. अखेर दोन दिवसानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी मुंबईला जाऊन या संदर्भात पाठपुरावा करणारआहे. चार सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणार असल्याचं आश्वासन अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. 


...तर पुन्हा आंदोलन करणार 


दरम्यान, चार सप्टेंबरपर्यंत जर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत तर शेतकरी पुन्हा आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तर तांदळाचा घोटाळा करणाऱ्या श्रीराम अभिनव सहकारी संस्थेचे जे संचालक फरार झालेत, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.


चार महिन्यांपासून शेतकऱ्यांचे पैसे थकवले


तांदूळ उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील शेकडो शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत. त्यामुळं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. चार महिन्यांपासून वारंवार जिल्हा पणन कार्यालयाच्यावतीनं शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे चुकारे न मिळाल्यानं अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं. जोपर्यंत हातात पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी आमदारांची कुठलीही गोष्ट ऐकायच्या मानसिकतेत नाहीत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील तांदूळ उत्पादकांचे जिल्हा पणन कार्यालयानं पैसे थकवले, शेतकऱ्यांचा आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर ठिय्या