Gondia Crime News : भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या पोलीस पाटलावरतीच कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंदियाच्या सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील फुक्कीमेटा येथे ही घटना घडली आहे. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला एका व्यक्तीने डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. त्याचबरोबर त्याच्या हातातून कुऱ्हाड हिसकावल्याने त्याने दुसऱ्याच्या पोटावर देखील चावा घेतला. गोंदियाच्या सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम फुक्कीमेटा येथे ही घटना घडली.
तेजराम येरपुडे (56) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पत्नी इंदू येरपुडे हिच्यासोबत भांडण करीत असल्याने इंदूने फिर्यादी पोलिस पाटील यांना बोलवले होते. पोलीस पाटील समजूत काढण्यासाठी घरी गेले. मात्र, तेथे गेल्यावर आरोपी तेजराम याने 'तू नेहमी माझ्या घरगुती भांडणात मध्ये पडतो. यामुळे पहिले तुलाच मारतो', असे म्हणत फिर्यादी चंद्रकुमार यांच्या डोक्यावर उजव्या बाजूला कुन्हाडीने वार केला.
यामध्ये चंद्रकुमार यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. एवढ्यात आरोपी तेजराम दुसरा वार करण्याच्या बेतात असताना डॉ. राजकुमार हत्तीमारे यांनी त्याच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतली. यावर आरोपी डॉ. हत्तीमारे यांच्या पोटावर उजव्या बाजूला चावा घेऊन पळ काढला. पोलिसांनी भान्यासं 2023 कलम 109 (1), 118 (१), 121 (२) 132 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
हे ही वाचा -
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण