Gondia News:  लग्नसोहळा आटोपून पुन्हा घरी जाणाऱ्या कुटुंबातील सदस्यांवर काळाने घातला. मोटरसायकलवरून एका 37 वर्षीय व्यक्तीसह आणि तीन चिमुकले घरी जात असताना ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात तीन चिमुकल्यांसह बाईकस्वारांचा मृत्यू झाला आहे. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. 


गोंदियाच्या (Gondia) रामनगर पोलीस स्टेशन (Gondia Ramnagar Police Station) अंतर्गत येणाऱ्या ढाकणी भागवत टोला रस्त्यावर ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. घटना स्थळी तिघांचा मृत्यू झाला. तर एकाचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 


आदित्य बिसेन (7 वर्ष) , मोहित बिसेन (११ वर्ष), कुमेंद्र बिसेन (37 वर्ष) (रा. दासगाव ) आणि आर्वी कमलेश तूरकर (5 वर्ष) (रा. चुटिया) अशी मृतांची नावे आहेत. अपघतानंतर ट्रक चालक घटना स्थळावरून फरार झाला.


गोंदिया येथील पिंडकेपार इथे लग्न सोहळ्याकरिता बिसेन कुटुंबीय दासगाव वरून आले होते. लग्न सोहळा संपल्यानंतर दासगाव येथे परत आपल्या मोटरसायकलने जात होते. त्यावेळी ढाकणी ते भागवत टोला या रस्त्यावर ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की, त्या धडकेत घटनास्थळी दोन मुलांचा व ३७ वर्षीय बिसेन यांचा मृत्यू झाला. अपघाताना नंतर ट्रक चालत घटना स्थळावरून फरार झाला. 


या अपघाताची माहिती रामनगर पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत जखमीना रूग्णालयात दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तर ट्रक चालकाविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.


ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार; घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकला लावली आग


गुरुवारीदेखील एक अपघात झाला होता. यामध्ये ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार झाला होता. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रकला आग लावली. गोंदिया शहरातील बाजपेयी चौक परिसरामध्ये एका ट्रकच्या धडकेत चिमुकला ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकला आग लावली वेळीच घटनास्थळी अग्निशमन दल पोचल्याने ट्रकची आग विझविण्यात आली. घटनास्थळावरून चालक फरार झाला. घटनास्थळी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती समजताच गोंदिया शहर पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.