गोंदिया : छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) भाजपच्या (BJP) एका वरिष्ठ नेत्याने बोलावून सांगितले की, तुम्ही जामिनावर आहात, त्यामुळे आक्रमक व्हा. म्हणून भुजबळ आक्रमक झालेत, असं खळबळजनक वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलं आहे.  भास्कर जाधवांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजलीये. सध्या राज्यात जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामाना पाहायला मिळाला. मनोज जरांगे यांच्यावर भुजबळ यांनी अगदी आक्रमक होऊन भाष्य केलं. त्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीये. 


येत्या निवडणुकांमध्ये सरकारचं आरोग्य नागरिकांनी बिघडवावं असं आवाहन ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे. गोदिंया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आरोग्य व्यवस्थांसंदर्भात विचारणार केली. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याकडे या सरकारचे लक्ष नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 2024 च्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरु केलीये.  गोंदिया मतदारसंघावर आमदार   भास्कर जाधव यांनी दावा केला असून 2024 च्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार लढवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. 


मंडल आयोग स्थापन झाले तेव्हा फडणवीस जन्माला आले होते का?


 मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये वाक् युद्ध सुरू आहे. या वाक् युद्धामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली असून छगन भुजबळ यांना शांत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.  त्यानंतर छगन भुजबळ यांनी मी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा देवेंद्र फडणवीस आमदार देखील नव्हते असे वक्तव्य केले. आता भास्कर जाधवांनी देखील फडणवीसांवर निशाणा साधला. मंडल आयोग जेव्हा स्थापन झाले, तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा जन्म तरी झाला होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 


भास्कर जाधव सामंतांवर कडाडले


भास्कर जाधव यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांचे कार्यकर्ते भूमिपूजन करतात असा आरोप उदय सामंत यांनी केला होता. त्यावर भास्कर जाधव यांनी उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की,  मतदारसंघांमध्ये जी मंजूर झालेली कामे आहेत ती मविआ सरकारमधली आहेत. त्या काळातली मंजूर कामांवर या नियमबाह्य आणि विश्वासघाती सरकारने स्टे आणला होता. मी उच्च न्यायालयात जाऊन सर्व आमदारांच्या कामांवरील स्टे उठवला.  उदय सामंत मंत्री झाले म्हणून त्यांना काही अभ्यास आहे असं नाही.  ते जर असे बोलले असतील तर मी त्यांचा समाचार घेईन, सोडणार नाही. 


हेही वाचा :


Bachchu Kadu : राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा शब्द पाळावा, अन्यथा मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उतरणार; बच्चू कडूंचा इशारा