Gondia Hit And Run Accident : गोंदिया (Gondia) शहरातून अपघाताचा एक मोठी बातमी समोर आली आहे. यात भरधाव कारचा थरार बघायला मिळाला असून रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोघांना या भरधाव कारने अक्षरक्ष: उडविले (Accident) आहे. या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV Camera) कैद झालेली आहे. गोरेगाववरून गोंदियाकडे येत असताना गोंदियातील पॉलिटेक्निक कॉलेज समोर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन ट्रक ड्रायव्हर आणि एक सायकल स्वार इसमाला उडवले आहे. या घटनेत दोन ट्रक ड्रायव्हर आणि सायकल स्वार गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या घटणेमुळे गोंदियात नव्यानं हीट अँड रनचा थरार बघायला मिळाला आहे. 


भरधाव कारने तिघांना उडविले, गोंदियात हीट अँड रनचा थरार


प्राथमिक माहितीनुसार, घटनेतील कारचालक भरधाव वेगाने गोंदिया शहरातील गणेशनगरकडे जात असताना ही घटना घडली आहे. खोमेश उरकुडे (वय 24 वर्ष रा. कोसेटोला, गोरेगाव) असे असुन जखमी मध्ये हेमराज राऊत (वय 54 रा. कारंजा ) आणि कादीर शेख (वय 38 रा. फुलचुर) तर सायकल स्वार देखील गंभीर जखमी असून यांच्या वर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही कार इतकी वेगात होती की त्यातील एक व्यक्ति लांबवर हवेत उडाल्याचेही बघायला मिळाले आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून हा अपघाताच्या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


मद्यधुंद प्रवाशानं बेस्टच्या ड्रायव्हरकडून स्टेअरिंग हिसकावलं, अन्...


अशाच एका धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली आहे. मुंबईतील (Mumbai News) गजबजलेल्या लालबाग (Lalbaug News) परिसरात बसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात  9 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बेस्टची 66 क्रमांकाची (BEST Bus 66 No) बस लालबागमध्ये गेल्यानंतर बसमधून प्रवास करणाऱ्या एका मद्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हरसोबत झटापट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रवाशानं ड्रायव्हरचं स्टेअरिंग हिसकावून घेतलं, त्यामुळे बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 


एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या नऊ पादचाऱ्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रम ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) वाहतूक शाखा आहे. मद्यधुंद प्रवाशानं केलेल्या कृत्यामुळे बस चालकाचं वाहनावरील ताबा सुटल्याने शहरातील लालबाग परिसरात पादचारी, कार आणि दुचाकींची धडक बसली. काळाचौकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून एक इलेक्ट्रिक बस सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असताना ही घटना घडली. 


 इतर महत्वाच्या बातम्या