एक्स्प्लोर

Girgaon: उकाड्यात गिरगावकर घामाघूम! दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा खंडीत, पाण्याचेही हाल, लाईट कधी येणार?

Girgaon and Mazgaon Power Cut: गिरगावातील वीजपुरवठा खंडित; भूमिगत केबलमध्ये तांत्रिक बिघाड, पुढील 2 ते 3 तासांत वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता.

South Mumbai Power Outage: न थांबणारे दक्षिण मुंबईकर (South Mumbai) सध्या वीजखंडितमुळे हैराण झाले आहेत.  मुंबईतील गिरगाव (Girgaon) परिसरात तसेच माझगाव परिसरातील काही भागांमध्ये रविवारी रात्रीपासून वीजपुरवठा (Electricity) खंडित झाला आहे. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे. सतत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वीजपुरवठा प्रभावित झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा त्रास दोन-तीन महिन्यांपासून नागरिकांना होत असल्याची तक्रार समोर आली आहे. 

दक्षिण मुंबईकरांना वीजेनं छळलं (Girgaon electricity supply disruption)

गिरगाव (Girgaon) परिसरातील काही भागांमध्ये रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ठाकूरद्वार रोड, जे.एस.एस. रोड, मुगभाट रोड, खेतवाडी, सी.पी. टँक आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांना या समस्येचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, ही समस्या केवळ आजची नसून, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. सकाळच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत, तसेच सायंकाळी नागरिक घरी परतत असताना, वीज जाण्याच्या घटनांमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

बेस्टच्या भूमिगत वीज केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती (Frequent Power Cuts Spark Anger Among South Mumbai Residents)

दरम्यान, बेस्टच्या भूमिगत वीज केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीये. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भूमिगत केबलवर क्षमतेपेक्षा अधिक लोड आल्यामुळे बिघाड निर्माण झालाय. तसेच परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या (इन्फ्रास्ट्रक्चर) कामांमुळेही केबलवर अतिरिक्त ताण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पुढील 2 ते 3 तासांत वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

वारंवार होणाऱ्या वीजखंडितमुळे नागरिक हैराण (Girgaon and Mazgaon Face Extended Blackout)

बेस्टचे कर्मचारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करत आहेत. वाढलेला वीजभार, जुनी केबल व्यवस्था आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या वीजखंडितमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, बेस्ट प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2'च्या स्पर्धेत 'राजा शिवाजी' ठाम, 31व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन झाले?

ABP माझाच्या बातम्या LIVE...

 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...
उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget