नागपूरः भारतात थेलेसेमिया व सिकल सेलचा जिन असून त्याचा त्रास न होणारे सुमारे पाच कोटी वाहक आहेत. मात्र वाहकांचे आपापसात लग्न झाल्यास त्यांच्या आपत्याला मात्र जीन्सचे कॉम्बिनेशन अत्यंत त्रासदायक ठरू शकते. यासाठी डॉ. विंकी रुघवानी यांनी 'जेनेटिक ब्लड मॅच ॲप' नावाचे मोबाईल अॅप सादर केले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते अॅपचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले.
थेलेसेमिया बाधितांना आयुष्यभर रक्तदानाची गरज पडत असते. तर सिकल सेल बाधितांचे जगणेही कठीन असते. भविष्यात आपल्या आणि जोडीदारामुळे होणाऱ्या अपत्यांना जन्मभर रक्तदानाची गरज पडू शकते. मात्र लग्नापूर्वी थोडी खबरदारी घेतल्यास हे संक्रमण टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी ही मोबाईल अॅप सादर करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून रक्ताचे रिपोर्ट मॅच केल्यास अपत्य कसं होणार याची माहिती मिळू शकते. त्यामुळे अशा दोघांनी एकमेकांशी लग्न करायचे अथवा नाही हे ठरवल्या जाऊ शकते. अशा प्रकारची ही पहिलीच अॅप देशात असून याच्या उपयोगितेमुळे येणाऱ्या पिढीला या संक्रमणापासून वाचवता येणार आहे, हे विशेष. डॉ. विंकी रुघवानी हे अनेक दशके थेलेसेमिया आणि सिकल सेल रुग्णांमध्ये काम करत आहेत.
...तर थेलेसेमिया व सिकल सेलचे जीन थांबवणे शक्य
यावेळी डॉ. मोहन भागवत म्हणाले, 'ह्या बाधितांना होणारा त्रास हा मोठा असून त्यातुन येणाऱ्या पिढ्यांची जर काही प्रमाणात सुटका होऊ शकत असेल तर शासन डॉक्टर यांनी एकत्रित येऊन एक टाइम बाऊंड कार्यक्रम बनविला तर या जीनला आपण थांबवू शकतो. याचा निर्धार आपण आजच केला पाहिजे. या आजाराविषयी माहिती देणारा हा अँप सगळ्यांपर्यंत पोहचवू असं म्हणत डॉक्टर भागवत ह्यांनी आमचे स्वयंसेवक या कामासाठी पुढे येतील अशी ग्वाही दिली. हे समाजउपयोगी कार्य फक्त स्वयंसेवकांनीच करून चालणार नाही तर इतरांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे हे पण अधोरेखित केले.
एक हजार थेलेसेमिया बाधित नोंदणीकृत
डॉ. विंकी रुघवानी यांनी आपल्याकडे एक हजारावर बाधितांची नोंदणी असून त्याच्यावर आपण नियमित उपचार आणि आरोग्याचा पाठपुरावा करत असल्याचे एबीपी माझाशी बोलतांना सांगितले. या अॅपच्या माध्यमातून थेलेसेमिया व सिकल सेल वाहकांना आपला जोडीदार निवडण्यापूर्वी मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.