Kolhapur ZP Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने आता लढती कशा होतील आणि किती जणांना घरी बसावे लागणार? याबाबत आता स्पष्टता येऊ लागली आहे. माजी मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव ‘गोकुळ’चे संचालक नविद हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मावळत्या सभागृहातील तब्बल 35 सदस्यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. कागल तालुक्यातील अंबरिश घाटगे यांचाही मतदारसंघ राखीव झाल्याने अडचण झाली आहे. त्यामुळे यावेळी मिनी विधानसभेत अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर इतर मतदारसंघात घुसखोरी सुद्धा पहायला मिळणार आहे.
आरक्षण सोडतीमध्ये कागल तालुक्यातील सिध्दनेर्ली, बोरवडे, चिखली हे झेडपी मतदारसंघ राखीव झाल्याने मोठी कोंडी झाली आहे. नाविद मुश्रीफ यांच्याकडे कसबा सांगाव, सेनापती कापशी मतदारसंघ असला, तरी त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेतील आरक्षण स्थिती कशी आहेय?
जिल्हा परिषदेच्या 76 मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यातील 5 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. एसटी महिला 1, ओबीसींना 20 पैकी 10 महिला असतील. सर्वसाधारण महिलांसाठी 22 मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. 23 मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत.
कागल तालुक्यातील कसबा सांगाव मतदारसंघात सर्वसाधारण आरक्षण पडल्याने विद्यमान सदस्य युवराज पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. सिद्धनेर्ली अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव अंबरिष घाटगे यांची अडचण झाली आहे. विरेंद्र मंडलिक यांनाही मतदारसंघ शोधावा लागणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या