गडचिरोली : विदर्भाचे शेवटचे टोक, नक्षल्यांचा जिल्हा, राज्यातील अतिमागास जिल्हा, अधिकाऱ्यांना घाम फोडणारा आणि विकासाचा सूर्य अद्याप उगवलेलाच नाही अशी ओळख असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली... (Gadchiroli Vidhan Sabha Election 2024) हा जिल्हा राज्यात नव्हे तर देशातील अति मागास जिल्ह्यांमध्ये येतो. गडचिरोलीला बदली, गडचिरोलीचे पालकमंत्रीपद म्हटले तर सगळेच दूर पळतात. नक्षल्यांच्या हिंसक कारवाया आजही विकासापासून दूर आणि समस्यांनी ग्रासलेले असलेले आदिवासी हे इथले वैशिष्ट्य आहे. एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला गडचिरोली मतदारसंघ भाजपचा (BJP) बालेकिल्ला झाला आहे. गडचिरोलीत गडचिरोली, आरमोरी, अहेरी हे तीन मतदारसंघ आहे.
गडचिरोली जिल्हा राज्याच्या ईशान्य दिशेला असून तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून ओळखला तर जातोच पण त्याबोरबर आदिवासी आणि घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा अतिदुर्गम, डोंगर द-याने व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी जवळपास 76 % टक्के भाग जंगलाने व्याप्त आहे. गडचिरोली आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांपासून अनेक गावं आजही कोसो दूर आहेत
गडचिरोली जिल्हा अनुसूचित जमातीसाठी राखीव
गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. गडचिरोलीला 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूरमधून विभक्त होत स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. सध्या या जिल्ह्यात तीन आमदार आहेत.दोन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे तर एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. या मतदारसंघाला भाजपाचा बालेकिल्ला म्हटले जाते.
गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?
- आरमोरी - कृष्णा गजबे (भारतीय जनता पक्ष)
- गडचिरोली - देवराम होळी (भारतीय जनता पक्ष)
- अहेरी - धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य
Armori Assembly constituency
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कृष्णा दामाजी गजबे यांनी काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत कृष्णा दामाजी गजबे यांना 75 हजार 77 मते मिळाली होती. तर आनंदराव गेडाम यांना 53 हजार 410 मते मिळाली होती.
Gadchiroli Assembly constituency
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. देवराव होळी यांनी काँग्रेसच्या डॉ. चंदा कोदवते यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत देवराव होळी यांना 97 हजार 913 मते मिळाली. तर डॉ. चंदा कोदवते याना 62 हजार 572 मते मिळाली होती.
Aheri Assembly constituency
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धर्मराव आत्राम यांनी अंबरिशराव आत्राम यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत धर्मराव आत्राम यांना 60 हजार 13 तर अंबरिशराव आत्राम यांना 44 हजार 555 मते मिळाली होती.
हे ही वाचा :