Chandrapur Vidhan Sabha:  कोळसा, सिमेंट, वीज, स्टील व पेपर, कोळसा खाणी आदी आघाडीच्या उद्योगांमुळे  चंद्रपूर (Chandrapur)  जिल्हा हा  औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो.    एवढच नाही तर वाघांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा प्रसिद्ध आहे. हा जिल्हा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा तसेच नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जाते. राज्याच्या राजकारण देखील  हा अतिशय शांत जिल्हा म्हणून राज्याच्या ओळखला जात होता.  मात्र 2014  नंतर जिल्ह्यातील राजकारण अतिशय वेगाने बदलत गेले.पूर्व विदर्भातील चंद्रपूर हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे.  चंद्रपूर लोकसभा मतदार संघात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचं जन्मगाव असलेल्या चंद्रपूर शहरातून सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपली मोहर उमटवली आहे. त्यामुळेच भाजपसाठी हा मतदार संघ अतिशय प्रतिष्ठेचा आहे. 1995 पर्यंत चंद्रपूर म्हणजे काँग्रेस असं समीकरण होतं. मात्र 1995  च्या भाजप-शिवसेनेच्या लाटेत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला आणि सुधीर मुनगंटीवार आमदार झाले. आतापर्यंत तब्बल तीन वेळा सुधीर मुनगंटीवार यांनी आणि मतदार संघ आरक्षित झाल्यानंतर नाना शामकुळे दोनवेळा आमदार झाले. मात्र या वेळी परिस्थिती बदलली आहे. 


लोकसभेला चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांचा दणदणीत विजय


चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, वरोरा, राजुरा, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर  या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.   अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात नवबौध्द मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत  भाजपसाठी  हा मतदारसंघ जड जाण्याची शक्यता आहे. कारण  लोकसभेच्या निवडणुकीत  2 लाख 60  हजाराच्या विक्रमी मताधिक्याने जिंकणाऱ्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना सहाही विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य मिळाले आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?



  • राजुरा- सुभाष धोटे, काँग्रेस

  • चंद्रपूर-  किशोर जोरगेवार, अपक्ष

  • बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार, भाजप

  • वरोरा- प्रतिभा धानोरकर, काँग्रेस

  • चिमूर - किर्तीकुमार भांगडिया, भाजप

  • ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार


2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य


राजुरा (Rajura Assembly constituency)


2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्य सुभाष धोटे यांनी  स्वतंत्र भारत पक्षाचे अॅड. वामनराव चटप यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत  सुभाष धोटे यांना 60 हजार 228 मते मिळाली होती. तर अॅड. वामनराव चटप यांना 57 हजार 727 मते मिळाली.


चंद्रपूर (Chandrapur Assembly constituency)


 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत  अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी  भाजपच्या नानाजी शमकुळे  यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत  जोरगेवार यांना 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली होती. तर नानाजी शमकुळे यांना 44 हजार 909 मते मिळाली आहेत. 


वरोरा (Warora Assembly constituency)


2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी शिवसेनेच्या संजय देवताळे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत धानोरकर  यांना 63हजार 862  मते मिळाली होती. तर संजय देवतळे यांना 53,665 मते मिळाली होती. संजय देवताळे  यांना 53,665 मते मिळाला होती. 


बल्लारपूर (Ballarpur Assembly constituency)


2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या डॉ. विश्वास झाडे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मुनगंटीवार यांना 86 हजार 2 मते मिळाली होती. तर डॉ. विश्वास झाडे यांना 52 हजार 762 मते मिळाली होती.


चिमूर  (Chimur Assembly constituency)


 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या  किर्तीकुमार भांगडिया यांनी काँग्रेसच्या सतिश वारजुकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत  किर्तीकुमार  भांगडिया यांना 87, 146 मते मिळाली होती. तर सतिश वारजुकर यांना 77 हजार 394 मते मिळाली होती. 


ब्रह्मपुरी (Bramhapuri Assembly constituency)


  2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी  शिवसेनेच्या संदिप गड्डमवार यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत वडेट्टीवार यांनी 96 हजार 726 मते मिळाली होती. तर गड्डमवार यांनी 78 हजार 177 मते मिळाली होती.