Ambadas Danve In Gadchiroli District: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आज गडचिरोली जिल्ह्याच्या (Gadchiroli District) दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आयोजित बैठकीत आढावा घेतला. ज्यात गडचिरोली जिल्ह्यातील बंद पडलेले अभियांत्रिकी महाविद्यालय, स्थानिकांना रोजगार, शेतकऱ्यांना शेतीसाठी वीजपुरवठा, पायाभूत व आरोग्य असुविधा याबाबत सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी दानवे यांनी आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान याचवेळी ते पक्षाच्या राजकीय कार्यक्रमांना देखील उपस्थित राहणार आहे. 


गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते दानवे यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिल्हा रुग्णालयाचे दोन एमआरआय यंत्रणेच्या खरीदीचे प्रस्ताव दोन वर्षांपासून धूळखात पडलेले आहे. एमआरआय (MRI) करण्यासाठी चंद्रपूर, नागपूरला रेफर केले जाते. यात होणारी हेळसांड थांबायला हवी. तर या जिल्ह्यात तब्बल 55  ग्रामपंचायतीना स्वतःची इमारत नाही. 212  गावांना अद्याप कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही. लोडशेडिंगचे प्रमाण प्रचंड असताना सौर ऊर्जेबाबाबत जनजागृती नाही. सरकारचे सगळे दावे फोल आहेत. तसेच स्थानिकांच्या जमिनी घेऊन त्यांना लहान नोकऱ्या देणे अमान्य आहे. त्यांच्यातील कौशल्य विकासासाठी आयटीआयचा अभ्यासक्रम बदलणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनावर यावर काम करण्याच्या सूचना केल्या असल्याचं दानवे म्हणाले. 


दरम्यान याचवेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आदिवासी मुलांचं वसतिगृह येथे आज भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी भोजनाचा निर्वाहभत्ता वाढवून देण्याची मागणी केली असता, हा मुद्दा सरकार दरबारी मांडण्याची ग्वाही यावेळी विद्यार्थ्यांना दिली. तर यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या अडचणी दानवे यांच्यासमोर मांडल्या. तर दानवे यांनी  वसतिगृहाची पाहणी करत तेथील सोयीसुविधांचा आढावा देखील घेतला. 


राजकीय कार्यक्रमांना राहणार उपस्थित...


गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या अंबादास दानवे यांनी प्रशासकीय आढावा घेतल्यावर राजकीय कार्यक्रमांना देखील उपस्थित राहणार आहे. दानवे यांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता आहेरी येथील शिवसेना शाखेचं उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. सोबतच यावेळी शिव संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने दानवे यांची सभा देखील होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


K. Chandrashekar Rao: केसीआरच्या पक्षाचा मराठी शिलेदार कोण ? तीन मोठ्या नेत्यांची चर्चा