गडचिरोली  : गडचिरोली (Gadchiroli News) येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आज 12 फेब्रुवारीच्या सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे घटनेमुळे  गडचिरोली शहरात एकच (Gadchiroli News) खळबळ उडाली आहे. उत्तम किसनराव श्रीरामे असे या 32 वर्षीय आत्महत्या (Suicide) केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी ‘ माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस व्हॉटस्अपला ठेवले होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 


डोक्यात बंदुकीची गोळी झाडून संपवले जीवन 


गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उत्तम यांचे तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. दरम्यान, त्यांनी यापूर्वी पुणे येथील राज्य राखीव दलाच्या गट क्र.1 मध्ये सेवा बजावली होती. सध्या ते गडचिरोली जिल्ह्यातील शिखरदीप या जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावात असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अशातच सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. ज्यामध्ये ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेतली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या शासकीय निवासस्थानी ही आत्महत्येची थरारक घटना घडली आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यातच संपवले जीवन 


शिखरदीप बंगल्यात सर्व आपल्या कामात व्यस्त होते. दरम्यान निवासस्थानी अचानक जोरदार गोळीबार झाल्याचा आवाज आला. त्यानंतर इतर सुरक्षा रक्षक आणि इतरांनी हा आवाज कोठून आला हे बघण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी उत्तम रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या घटनेआधी काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी संजय मीणा हे सुटीवरून बाहेर गावाहून गडचिरोली येथे आपल्या शासकीय बंगल्यात पोहोचले होते.


या घटनेनंतर जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गडचिरोली पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा सुरू करत उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. तर या प्रकरणाची माहिती देतांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तपास सुरू असून त्यानंतर कारण स्पष्ट होईल असे देखील ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या