एक्स्प्लोर

पुणे-बंगळुरू महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील वहागाव या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील वहागाव या ठिकाणी भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल चार युवकांना जीव गमवावा लागला आहे. हे सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या भागातील असल्याचं समोर आलेले आहे. अपघातग्रस्त वाहन स्विफ्ट गाडी असून या गाडीमध्ये एकूण पाचजण सिंधुदुर्ग ते मुंबई असा प्रवास करत होते. ही स्विफ्ट गाडी कराड सोडून पुढे आल्यानंतर तळबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर ती कठडा ओलांडून विरूद्ध दिशेला गेली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांवर आदळली.

या अपघातात निलेश मोडकर, मनोज परब, अंकुश शिंदे, भरत बोडकर या चौघांचा जागीचा मृत्यू झाला तर रोशन वरद हा थोडक्यात वाचला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार ही मुंबईच्या दिशेने जात असताना तिचा वेग हा जवळपास 160 असल्याचे स्पीडोमीटरच्या फोटो वरून दिसत आहे. ज्या वेळेला हा अपघात झाला त्या वेळेला स्पीडोमीटरही बंद पडले. या स्पीडोमीटरची नोंद पोलिसांनी आपल्या तपासादरम्यान करून घेतलेली आहे.

वहागावच्या वळणावरून जाताना गाडीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्ता सोडून विरूद्ध दिशेतून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांवर आदळली. या वाहनाचे स्पीड 160 असल्यामुळे वाहन चालकाला आपल्या गाडीवरील ताबा मिळवता आला नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तळबीड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी हजर झाले आणि जखमीना गाडीतून बाहेर काढले. हा अपघात एवढा भीषण होता की या मृत झालेल्या चौघांच्या शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे झाले होते. अपघाताचे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहत होता. जखमीला कराड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित चौघांचे शवविच्छेदन करण्यासाठी शवागृहात नेण्यात आले आहे. आज रविवार असल्यामुळे महामार्गावर प्रचंड मोठ्या वाहनांच्या रांगा होत्या. त्यात हा अपघात झाल्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदमांचे आरोप खोटे, त्यांना कायदेशीर नोटीस देणार, सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले त्यांच्यावर आग्र्यात उपचार करावेत
रामदास कदमांचे आरोप खोटे, त्यांना कायदेशीर नोटीस देणार, सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले त्यांच्यावर आग्र्यात उपचार करावेत
Gokul : सतेज पाटलांनी निकालानंतर उन्माद केला, अध्यक्ष निवडीचा बहुमान परमेश्वराने आम्हाला दिला, अध्यक्ष महायुतीचाच होईल; बोलता-बोलता हसन मुश्रीफांचा इशारा
सतेज पाटलांनी निकालानंतर उन्माद केला, अध्यक्ष निवडीचा बहुमान परमेश्वराने आम्हाला दिला, अध्यक्ष महायुतीचाच होईल; बोलता-बोलता हसन मुश्रीफांचा इशारा
अजित पवार अपघात प्रकरण! रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप ऐकले नाहीत, पण... दिवाळीनंतर शेवटचं प्रेझेन्टेशन घेणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजित पवार अपघात प्रकरण! रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप ऐकले नाहीत, पण... दिवाळीनंतर शेवटचं प्रेझेन्टेशन घेणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Embed widget