नवी दिल्ली : देशाअंतर्गत ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी फ्लिपकार्ट आपल्या 1000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांचा परफॉमन्स चांगला नाही, त्यांना कंपनी बाहेरचा रस्ता दाखवू शकते. कंपनीने अद्याप किती कर्माचाऱ्यांची कपात करणार हे अद्याप स्पष्ट केले नाही. पण जवळपास ७०० ते १००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे.

 

फिल्पकार्टने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉमन्स चांगला नाही. त्यांना इतर कंपनींमध्ये रोजगार शोधण्यास सांगण्यात आले आहे. आयटी क्षेत्रात ही नित्याची बाब आहे. नुकतेच कंपनीने देखील आपल्या व्हॉल्यूएशनमध्ये कपात केली आहे. तसेच कंपनीने आपल्या बिझनेस मॉडेलमध्येही बदल केला आहे. यामध्ये विक्रेत्याला चार्ज करण्यासाठी मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली आहे.

 

वास्तविक, ई-कॉमर्स क्षेत्राला मंदीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे देशांतर्गत प्रतिस्पर्धी अमेझॉन सारख्या परदेशी कंपन्यांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरु असलेली स्पर्धेमुळे ई-कॉमर्स क्षेत्रावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. फ्लिपकार्ट आपली कॉम्पीटिटर स्नॅपडील आणि अमेझॉन यांच्यापासून पुढे राहण्यासाठी फ्लिपकार्टकडून कॉस्ट कटिंग सुरु आहे. सध्या फ्लिपकार्ट कंपनीमध्ये 30,000 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे त्या सर्वांचा परफॉर्मन्स रिव्ह्यू करण्यात येत आहे.

 

2007 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने याच आठवड्यात ऑनलाईन फॅशन रिटेलर जाबॉन्गला 7 कोटी डॉलर रोख देऊन खरेदी करणार असल्याची घोषण केली होती. फ्लिपकार्टची सहाय्यक कंपनी मिंत्रा आता जबॉन्गच्या खरेदीनंतर सर्वात मोठी ऑनलाईन फॅशन रिटेलर कंपनी बनणार आहे. मिंत्राला गेल्याच वर्षी फ्लिपकार्टने 3 कोटी डॉलरला खरेदी केले होते.

 

संबंधित बातम्या

 

फॅशन रिटेलर Myntra कडून स्पर्धक कंपनी jabong खरेदी



भारतात flipcart ला मागे टाकून Amazon नंबर वन