एक्स्प्लोर

'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा' योजनेतील बक्षीस घेण्यास मुंबईकरांचा नकार

महापालिका प्रशासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर याबाबत लोकप्रतिनिधींमधून तीव्र नाराजी पसरली होती. महापालिका करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचे सांगत कोणत्याही स्वरुपाची मान्यता न घेता नियमबाह्यप्रकारे ही रक्कम दिली जात असल्याचा आरोपही लोकप्रतिनिधींनी केला होता.

मुंबई : महापालिकेच्या एक आठवडाभर चाललेल्या 'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा' या योजनेतल्या बक्षीस जिंकलेल्या मुंबईकरांनी बक्षीस घेण्यास नकार दिला आहे. 'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा' या योजनेच्या अंतर्गत 155 तक्रारदारांपैकी 75 तक्रारदारांनी बक्षीसाचे पैसे स्विकारले तर 80 जणांनी नाकारले आहेत. रस्त्यावर पडलेला खड्डा दाखवा आणि 48 तासांमध्ये खड्डा न भरल्यास 'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा' अशा प्रकारची बक्षीस योजना महापालिकेनं जाहीर केली होती. यामध्ये 155 ठिकाणी नियोजित वेळेत खड्डे भरले गेलेच नव्हते. त्यामुळे 155 लोकांपैकी केवळ 75 तक्रारदारांनीच 500 रुपयांचे बक्षीस आतापर्यंत स्वीकारले आहे. मात्र, काही लोकांनी बक्षिसाची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला आहे. या बक्षीस योजनेवर 37 हजार 500 रुपये खर्च झाले आहेत. हे सर्व पैसे अधिकार्‍यांच्या खिशातून खर्च केले आहेत. मुंबईतील खड्ड्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यांवर पडलेला खड्डा दाखवा आणि हा खड्डा भरला न गेल्यास 500 रुपये देण्यात येतील अशी योजना जाहीर केली होती. या योजनेतंर्गत नागरिकांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांची छायाचित्रे महापालिकेच्या पोर्टलवर अपलोड केली होती. त्यानुसार महापालिकेने या खड्डंयांचे निवारण केले. परंतु काही खड्डंयांच्या तक्रारींचे निवारण हे निश्चित केलेल्या वेळेत न झाल्याने संबंधित तक्रारदारांना जाहीर केल्याप्रमाणे 500 रुपयांचे बक्षीस स्वरुपात घेण्यात देण्यात आले. या योजनेमध्ये एकूण 1630 खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी निश्चित केलेल्या वेळेत 1475 तक्रारींचे निवारण करण्यात आले होते. तर 155 तक्रारींचे निवारण करण्यात आले नव्हते. त्यामुळे रस्ते विभागाकडून 75 तक्रारदार नागरिकांनीच प्रत्येकी 500 रुपयांची बक्षीसाची रक्कम स्वीकारली. मात्र, उर्वरीत काही नागरिकांनी बक्षीसाची रक्कम स्वीकारण्यास नकार कळवला आहे. महापालिका प्रशासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर याबाबत लोकप्रतिनिधींमधून तीव्र नाराजी पसरली होती. महापालिका करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचे सांगत कोणत्याही स्वरुपाची मान्यता न घेता नियमबाह्यप्रकारे ही रक्कम दिली जात असल्याचा आरोपही लोकप्रतिनिधींनी केला होता. यावर, बक्षीसाची ही रक्कम विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या खिशातून दिली जाणार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले होते. त्यानुसार बक्षीसाची ही रक्कम विभागातील सहायक आयुक्त, तसेच रस्ते अभियंता यांच्या खिशातून परस्पर देण्यात आली होती. त्यामुळे तब्बल 37 हजार 500 रुपये अधिकार्‍यांच्या खिशातून आतापर्यंत गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

L Balaji India A Head Coach : लक्ष्मीपती बालाजीची भारत अ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून सांभाळणार धुरा
बीसीसीआयचा अनपेक्षित डाव! आगामी मालिकेसाठी लक्ष्मीपती बालाजीकडे मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?
Shubman Gill NZ vs IND ODI News : न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? शुभमन गिल OUT, श्रेयस अय्यरकडे जाणार कर्णधारपदाची धुरा, नेमकं कारण काय?
न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? शुभमन गिल OUT, श्रेयस अय्यरकडे जाणार कर्णधारपदाची धुरा, नेमकं कारण काय?
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata: टाटा ग्रुपमधील वाद कोर्टात जाणार? टाटा ट्रस्टसनं एन.चंद्रशेखरन यांची टाटा सन्समधील नियुक्ती फेटाळली, अभिषेक मनु सिंघवींवर मोठी जबाबदारी
टाटा ग्रुपमधील वाद कोर्टात जाणार, टाटा ट्रस्टसकडून सुप्रीम कोर्टातील वकिलावर मोठी जबाबदारी
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीबीआय संचालक ते माजी लष्करप्रमुखांना सुद्धा निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय घडलं?
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू बेशुद्ध पडला, थेट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर; वडिल पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू बेशुद्ध पडला, थेट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर; वडिल पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
Embed widget