Fitness Tips : निरोगी राहण्यासाठी व्यायाम (Excercise) करणं खूप गरजेचं आहे. आजकाल आपण पाहतोयत लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. या कारणामुळे अनेकजण वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिमला जातात. अनेक जण वर्कआउटद्वारे आपलं वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक वजन लवकर कमी करण्यासाठी हेव्ही वर्कआउट रूटीन फॉलो करतात. पण, ट्रेनर्स नेहमी तुमच्या शरीरानुसार जिममध्ये वर्कआऊट करण्याचा सल्ला देतात.    


परिणामी, हेव्ही वर्कआऊट केल्याने आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे बऱ्याचदा लोक अचानक जिम सोडतात. यामुळे तुमची अनेक महिन्यांची मेहनत वाया जाते. पण, अचानक जिम सोडल्यानेही शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


काय परिणाम होईल?


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही अचानक जिमला जाणे बंद केले तर तुमची फिटनेस लेव्हल पुन्हा शून्यावर येऊ शकते. म्हणजेच, तुम्ही केलेली सर्व मेहनत वाया जाईल. याशिवाय तुमचा लठ्ठपणाही परत येऊ लागेल आणि तुमची एनर्जी लेव्हलही कमी होईल.


फुफ्फुसांवर परिणाम


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, व्यायामा दरम्यान हृदय आणि फुफ्फुस अधिक क्षमतेने काम करतात. अचानक जिम सोडल्याने त्यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय, स्नायूंच्या ताकदीत घट देखील दिसू शकते. एवढेच नाही तर, शरीरातील संतुलनही बिघडू शकते. व्यायाम करताना आपले चयापचय क्रियाशील राहते. पण जर तुम्ही अचानक कसरत सोडली तर त्यातही घट दिसून येते.


नुकसान कसे टाळाल?


जर तुम्हाला काही कारणास्तव जिम सोडावी लागत असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. अचानक व्यायाम पूर्णपणे थांबवू नका. त्याऐवजी हळूहळू कमी करा. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी निरोगी ठेवा. योगाचा सराव करत राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ध्यान करा. WHO नुसार, व्यक्तीने आठवड्यातून 150 मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत.


यामुळेच जर तुम्ही जिम सोडणार असाल तर हळूहळू व्यायाम कमी करायला सुरुवात करा. तसेच, घरबसल्या देखील थोडेफार व्यायाम करू शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' हंगामी भाज्यांमध्ये दडलाय पोषक तत्त्वांचा खजिना, आजच आहाराचा भाग बनवा; त्वचेसाठीही गुणकारी