Seasonal Vegetables : हिवाळ्याचे (Winter) दिवस सुरु आहेत. त्यानुसार बाजारात देखील हंगमी फळं, भाज्या (Vegetables) दिसायला सुरुवात झाली आहे. या दिवसात संपूर्ण बाजारपेठ विविध प्रकारच्या हिरव्या, लाल, पिवळ्या आणि रंगीबेरंगी भाज्यांनी भरलेली दिसते. विशेषतः हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळतायत. या हंगामी भाज्या केवळ तुमच्या जेवणाची चवच वाढवत नाहीत तर तुमच्या आरोग्यसाठीही या भरपूर फायदेशीर आहेत. या हंगामी भाज्या आपल्या आरोग्यासाठी कशा गुणकारी आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.   


हिरवे वाटाणे (Green Peace)


हिरव्या वाटाण्यात हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे जसे की, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यामध्ये आढळतात. हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात, हिरव्या वाटाण्यापासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता. जसे की, पराठे, भाजी, पुलाव, सार, भजी इ. 


कांद्याची पात 


व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, फॉस्फरस, फोलेट आणि पोटॅशियमने समृद्ध असलेली कांद्याची पात अतिशय पौष्टिक मानली जाते. निरोगी राहण्यासाठी तसेच पचनसंस्था नियंत्रित करण्यासाठी याचे अनेक फायदे आहेत. 


हिरवा लसूण


हिरव्या लसणात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह आढळते आणि ॲलिसिन नावाचे अँटी-ऑक्सिडेंट देखील आढळते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या लसणाचा वापर तुम्ही चटणी, कोशिंबीर, आणि भाज्या बनवण्यासाठी करू शकता. 


कोबी


या कमी-कॅलरी असलेल्या भाजीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. हे पाचन तंत्र मजबूत करते, हृदयाच्या आरोग्याची काळजी घेते आणि संक्रमणांपासून संरक्षण करते.


फुलकोबी


कार्टिनॉईड्स, जीवनसत्त्वे, फायबर, विद्राव्य साखर, फोलेट आणि पोटॅशियम आढळतात.


बीट (Beetroot)


बीट हा नायट्रेटचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रक्त प्रवाह संतुलित राहतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. हे फोलेट, मँगनीज, फायबर, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. ते सलाड म्हणून खा किंवा सूपमध्ये वापरा.


गाजर (Carrot)


व्हिटॅमिन ए समृद्ध गाजर डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे एक चांगले अँटी-ऑक्सिडेंट देखील आहे, ज्यामुळे ते वृद्धत्व विरोधी म्हणून काम करते. याशिवाय व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि फायबर देखील यामध्ये आढळतात. कोशिंबीर, पुलाव, हलवा यांसारखे पदार्थ गाजरापासून बनवले जातात.


तूप


तूप हे एक सुपरफूड आहे. हाडांसाठी ते वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते, जे हाडांना मजबूती देते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Fitness Tips : वयाच्या तिशीनंतर व्यायाम करताना 'या' 5 चुका करू नका; अन्यथा..'या' समस्यांचा वाढता धोका