Mumbai Local Mega Block Sunday 28 January : मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने रविवारी 20 ऑगस्ट रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे हार्बर आणि मध्य रेल्वेच्या लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करण्याआधी मेगा ब्लॉकबाबत जाणून घ्या


माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05  ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.15 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.


ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत  सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील,  पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. 


डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.10 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.39 वाजता सुटेल. अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.10 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सायंकाळी 4.44 वाजता पोहोचेल.


पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत
(बेलापूर-उरण आणि नेरुळ-उरण बंदर मार्ग सेवा प्रभावित नाही)


पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.11 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


पनवेल येथून सकाळी 11.01 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


डाउन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.16 वाजता सुटेल आणि सायंकाळी  4.36 वाजता पनवेल येथे पोहोचेल.


अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल सकाळी 10.1७ वाजता पनवेल येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सकाळी 11.36 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी 4.10 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल. 


डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी 9.39 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी 10.31 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे येथून सायंकाळी 4.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सायंकाळी 04.51 वाजता पोहोचेल. 


अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.41 वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी 11.33 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी 4.16 वाजता सुटेल आणि ठाणे येथे सायंकाळी 5.10 वाजता पोहोचेल. 


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागात विशेष लोकल चालविण्यात येतील.


ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.


ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.