एक्स्प्लोर

Government scheme : शेतीमध्ये हरितगृह उभारणी, फलोत्पादन यांत्रिकीकरण, प्लॅस्टिक मल्चिंग आदींसाठी अनुदान हवाय? आजच येथे करा अर्ज

शेतीच्या विविध कामांसाठी शासनाच्यावतीने अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी केले आहे.

नागपूर :  जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान चालु वर्षात राबविण्यात येत असून या शेतकऱ्यांनी याअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत विविध कामांसाठी शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विविध योजना

हरितगृह उभारणी- यासाठी कमीत कमी 500 चौरसमीटर ते जास्तीत जास्त 4 हजार चौरसमीटरपर्यंत अनुदान देय राहील. रक्कम 844  रुपये ते 1 हजार 465  रुपये चौरसमीटर मापदंडानूसार येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के जे कमी असेल ते अनुदान सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना देय राहील.

शेडनेट हाऊस उभारणी – यासाठी कमीत कमी 1 हजार  ते जास्तीत जास्त 4 हजार चौरसमीटरपर्यंत अनुदान देय राहील. रक्कम 381 रुपये ते 700 रुपये चौरसमीटर मापदंडानुसार येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या जे कमी असेल ते अनुदान सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना देय राहील.

सामुहिक तळे- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात सामुहिक शेततळे हा घटक 100  टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे.

फलोत्पादन यांत्रिकीकरण – ट्रॅक्टर या घटकास अनुसूचित जाती व जमाती, महिला, सिमांत शेतकऱ्यास खरेदी किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 1 लाख तसेच सर्वसाधारण घटकास खर्चाच्या 25 टक्के जास्तीत जास्त 75 हजार अनुदान देय आहे.

संत्रा पुनरुज्जीवन- संत्रा पुनरुज्जीवन या घटकात कमीत कमी 0.20 हेक्टर व जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत लाभ देय असून येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रुपये अनुदान देय आहे.

हळद क्षेत्र विस्तार- या घटकात कमीत कमी 0.50 हेक्टर ते जास्तीत जास्त 1 हेक्टरपर्यंत लाभ देय आहे. सरासरी लागवड खर्चाच्या 40 टक्के व जास्तीत जास्त 12 हजार रुपये अनुदान देय आहे
 
प्लॅस्टिक मल्चिंग-  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्लॅस्टिक मल्चिंग या घटकात जास्तीत जास्त 2 हेक्टरमर्यादेपर्यंत लाभ देण्यात येत असून खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्रती हेक्टर अनुदान देय आहे.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण-  प्लॅस्टिक फिल्म अस्तरीकरण या घटकासाठी अनुज्ञेय खर्चाच्या 50 टक्के अथवा जास्तीत जास्त 75 हजार रुपये  अनुदान देय आहे.

फळपिक लागवड- एकात्मिक फलोत्पादन अभियांनातर्गत नावीण्यपूर्ण फळपिक ड्रॅगन फ्रुट व इतर फळपिक लागवडीसाठी प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के या प्रमाणे अनुदान देय आहे.

या सर्व योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Thane Crime News: ‘रिंकू कुठे आहे? त्याला आज संपवून टाकतो’; हातात चॉपर घेऊन हॉटेलमध्ये धुडगूस, ठाण्यातील धक्कादायक घटना
‘रिंकू कुठे आहे? त्याला आज संपवून टाकतो’; हातात चॉपर घेऊन हॉटेलमध्ये धुडगूस, ठाण्यातील धक्कादायक घटना
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget