एक्स्प्लोर

'भारत बंद'ला राज्यात उत्फुर्त तर मुंबईत तुरळक प्रतिसाद, लोकल ट्रेन सुरळीत

भारत बंद मुंबईत मात्र तुरळक प्रतिसाद मिळाला. लोकल ट्रेनही सुरळीत सुरु होत्या. सायन पनवेल हायवेवर रास्तारोकोचा प्रयत्न करण्यात आला होता.

मुंबई : नव्या कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला होता. या भारत बंदला देशभरातून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातही या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. भारत बंद मुंबईत मात्र तुरळक प्रतिसाद मिळाला. लोकल ट्रेनही सुरळीत सुरु होत्या. सायन पनवेल हायवेवर रास्तारोकोचा प्रयत्न करण्यात आला होता.

नाशिक

नाशिक- भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी कडकडीत बंद पुकारला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू होते. बाजार समितीने आधी कल्पना दिली नसल्याचे व्यपाऱ्यांचं म्हणणं आहे, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातहुन गाजर, मिरची, वाटाणा हा शेतीमाल तीन दिवसांपासून नाशिकच्या दिशेनं निघाला होता. तो शहरात पहाटे दाखल झाला, त्यामुळे बंदला पाठिंबा देत नुकसान टाळण्यासाठी व्यवहार करावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे

सोलापूर

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे. बाजारात अगदी पहाटे पासून सुरू होणारे लिलाव आज बंद पाहायला मिळाले. कांदा, भुसार, किराणा मालाची बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. तर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी किरकोळ भाजी विक्री करण्यात येणारी भाजी मंडई मात्र सुरूच ठेवण्यात आली आहे. शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंद करण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुसार काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार या सर्वांची एकत्रितपणे बैठक पार पडली. त्यानुसार बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज बंद मध्ये सर्वच घटक सहभागी झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.

नागपूर

नागपूरचे प्रसिद्ध संत्रा मार्केटमधील व्यवहार सुरू आहेत. व्यापारी आपले माल विक्रीसाठी घेऊन बसले आहेत. दुकाने उघडी आहेत. मात्र रोजच्या तुलनेत ग्राहक आणि विक्री कमी झाली. नाशवंत माल असल्याने आमचा नाईलाज असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 नांदुरा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात अडवला होता. काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जवळपास 500 कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.  बुलढाणा जिल्ह्यात 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याच चित्र पाहायला मिळालं. बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. आज सर्व शाळा महाविद्यालय बंद होत्या. मात्र लांब पल्ल्याच्या तुरळक एसटी बसेस धवताना दिसल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: कन्यापूजनाचा अचूक मुहूर्त, अष्टमी-नवमी-दसऱ्याच्या तिथीचा संभ्रम आजच दूर करा! धार्मिक महत्त्व, मुहूर्त, पूजा पद्धत..
कन्यापूजनाचा अचूक मुहूर्त, अष्टमी-नवमी-दसऱ्याच्या तिथीचा संभ्रम आजच दूर करा! धार्मिक महत्त्व, मुहूर्त, पूजा पद्धत..
Horoscope Today : आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट येणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट येणार? वाचा आजचे राशीभविष्य
Amravati Accident News: भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
Shardiya Navratri 2026: आज नवरात्रीची सातवी की आठवी माळ? सप्तमी दोनदा आल्याने संभ्रम; आज कोणत्या देवीची पूजा? शुभ रंग, नैवेद्य, मुहूर्त..
आज नवरात्रीची सातवी की आठवी माळ? सप्तमी दोनदा आल्याने संभ्रम; आज कोणत्या देवीची पूजा? शुभ रंग, नैवेद्य, मुहूर्त..

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget