Tips To Control Emotions: भावनांना कंट्रोल करावं तरी कसं ? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
लोकांची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. काही लोकांना पटकन राग येतो तर काही लोक लगेच इमोशनल होतात. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास अनेक समस्या आपोआप सुटतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण नसेल, तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही सोप्या टिप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता.
एक्सरसाईज हे स्ट्रेस बस्टर आहे, असं मानलं जातं. व्ययाम केल्यानं तुम्ही भावनांवर नियंत्रण आणू शकता, त्यामुळे नियमित व्यायाम करा.
जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल आणि भावना व्यक्त करता येत नसतील तर तुम्ही गाणी ऐका किंवा डान्स करा, यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल.
भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगा करणं देखील फायद्याचं ठरेल. योगा केल्यानं केवळ शरीर नाही, तर मन देखील निरोगी राहते. शरीराच्या आरोग्याबरोबरच मेंटल हेल्थकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे.
इमोशन्सवर कंट्रोल आणायचा तर सर्वात सोपा उपाय म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन करताना माणूस सगळे विचार विसरुन एकाग्र होतो.
जर तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवायचे असेल तर इतरांच्या भावनांच्या आधी स्वत:च्या भावनांचा आदर करा. स्वत:च्या भावना समजून घ्या. कोणत्या सवयींमुळे तुम्हाला त्रास होतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्या सवयी सोडण्याचा प्रयत्न करा.
इतरांचा विचार करु नका, प्रत्येक गोष्टीबद्दल मोकळेपणानं बोला. त्यामुळे तुम्ही भावनांवर नियंत्रण आणू शकता.