नागपूर:  महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायद्यांतर्गत अनुसूचित कत्तल पूर्व तपासणीसाठी प्रती जनावरे दोनशे रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. बकरी ईद सण साजरा करणाऱ्या नागरिकांनी सेवाशुल्क भरुन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. बकरी ईद साजरी करण्याबाबत नियोजनासाठी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक कार्यकारी मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. 
जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. राजेंद्र महल्ले, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विजयसिंग राठोड, अमित कराडे, पोलीस सहाय्यक आयुक्त  योगेश मोरे, अशासकीय सदस्य करिश्मा गिलानी, प्रदिप कश्यप यावेळी उपस्थित होते.


वाचाBlack Wheat : वर्ध्यात शेतीचा नवीन प्रयोग, पहिल्यांदाच काळ्या गव्हाची यशस्वी लागवड


23 मे च्या शासन निर्णयानूसार पशुसंवर्धन विभागाच्या सेवाशुल्कात सुधारणा करण्यात आली आहे. अस्थाई स्वरुपाच्या कत्तल खाण्यामधून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यांचे व्यवस्थापन आणि आवश्यक स्वच्छतेचा रखरखाव महानगर पालिकेने करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नागपूर आणि कमठी शहरात तात्पुरत्या स्वरुपाचे अकरा कत्तलखाने प्रस्तावित करण्याचे नियोजित असून कत्तलखान्यावर 9 ते 13  जुलै दरम्यान पशुसंवर्धन विभाग नागपूरतर्फे महाराष्ट्र प्राणी रंक्षण कायद्यामधील सुधारणानूसार अनुसूचित प्राण्यांची कत्तलपूर्व तपासणी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक शहर व तालुकास्तरावर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या


Bakri Eid 2022 : बकरी ईदसाठी देवनार पशुवधगृह सज्ज, चोरी टाळण्यासाठी बकऱ्यांना लागणार बारकोड


Sanjay Raut Exclusive: "तुम्ही का गेला सर्वांना माहितीय, ढोंग बाजूला ठेवा", राऊतांचा बंडखोरांना टोला


Amarnath Yatra : अमरनाथमध्ये मोठी दुर्घटना, ढगफुटीमुळे लंगर आणि तंबू गेले वाहून, 10 जणांचा मृत्यू


ईडीची मोठी कारवाई, उमरग्यातील एका नामांकित कंपनीची 46 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त