Black Wheat in Wardha : रोजच्या जेवणातील चपाती तयार करण्यासाठी वापरलं जाणारं धान्य म्हणजे गहू. भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील एक सर्वाधिक वापरलं जाणारं धान्य आहे. गव्हाचा रंग इतका परिचित आहे की गव्हाच्या रंगाप्रमाणे व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करताना गव्हाळ रंग हा शब्द वापरला जातो. पण अशातच चक्क काळ्या रंगाचा गहू महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात पिकवण्यात आला आहे. वर्ध्यात गेल्या काही महिन्यांमध्ये काळ्या गव्हाचा विषय कुतूहलाचा विषय ठरला असून त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील जळगाव येथील सुशिक्षित शेतकरी राजेश डफर यांनी काळ्या गव्हाचं यशस्वी उत्पादन घेतल आहे. या गव्हाला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने शेतकऱ्यांना काळ्या गव्हाची शेती मालामाल करु शकते.
एक एकर जमिनीवर घेतलं 17 क्विंटल उत्पादन
देशातील पंजाब, हरियाणा राज्यात काळ्या गव्हाच्या लागवडीचे प्रमाण वाढले आहे. अशात महाराष्ट्राच्या वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील जळगावच्या शेतकऱ्याने या गव्हाबद्दल पूर्ण माहिती घेतली बियाणे मिळवले आणि स्वतःचं याचं उत्पादन घेतलं आहे. काळ्या गव्हाचे बियाणे साधारणतः 80 रुपये किलो दराने मिळतातय एक एकर क्षेत्रावर 45 किलो बियाण्यांची पेरणी केल्यास सर्व साधारणपणे 17 क्विंटल उत्पादन या शेतकऱ्याने घेतले आहे. बी कॉमची डिग्री असणारे वर्ध्यातील 39 वर्षीय पदवीधर शेतकरी शेतकरी राजेश डफर यांना हा नवा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे.
इतर गव्हापेक्षा यात काय वेगळं?
आरोग्यासाठी अतिशय लाभदायी असल्याने हा काळा गहू आता हळूहळू बरेचजण वापरु लागले आहेत. या काळ्या गव्हाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्या सोबतच सर्वसाधारण गव्हापेक्षा या काळ्या गव्हात साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने मधुमह असणाऱ्या रुग्णाला देखील या गव्हाचे सेवन करता येते, अशी माहिती राजेश यांनी दिली आहे.
हे ही वाचा-