Google Barbie: बार्बी (Barbie) हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या चित्रपटाला भारतातील प्रेक्षकांची देखील पसंती मिळत आहे. भारतातील बॉक्स ऑफिसवर देखील बार्बी या चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. आता गूगल या सर्च इंजिनवर देखील बार्बी चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे. जर तुम्ही गूगलवर बार्बी चित्रपट किंवा या चित्रपटामधील कलाकारांची नावे सर्च केली तर तुम्हाला पिंक स्पार्कल्स स्क्रिनवर दिसणार आहेत. तुम्ही हे तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर पाहू शकणार आहात.  


जेव्हा तुम्ही बार्बी, ग्रेटा गेरविग, मार्गोट रॉबी आणि रायन गॉसलिंग हे शब्द गूगलवर सर्च करता तेव्हा तुम्हाला एक स्पेशल इफेक्ट स्क्रिनवर दिसेल. गूगलवर जर तुम्ही बार्बी आणि बार्बी चित्रपटामधील कलाकार ग्रेटा गेरविग, मार्गोट रॉबी आणि रायन गॉसलिंग यांची नाव सर्च केली तर तुम्हाला स्क्रिनवर पिंक कलरचे स्पार्कल्स दिसतील. त्यानंतर पूर्ण स्क्रिन पिंक कलरची होईल. तसेच तुम्हाला गूगलचा लोगो देखील पिंक कलरचा दिसेल. 


गूगगने स्क्रिनच्या खालच्या बाजूला दोन आयकॉन देखील दिले आहेत. त्यापैकी एक आयकॉन पार्टी पॉप-अपचे आहे. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर पिंक कलरचे पार्टी पॉप-अप्स म्हणजेच स्पार्कल्स तुम्हाला स्क्रिनवर दिसतील. , तुम्हाला हवे तितक्या वेळा तुम्ही  या पॉप-अप्सचा आनंद घेऊ शकता. ज्याने तुमची स्क्रिन शाइन होईल. तसेच तुम्हाला दुसरे आणखी एक आयकॉन देखील दिसेल हे आयकॉन टच करुन तुम्ही हे गूगलचे सर्च पेज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करु शकता. ज्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हे बार्बी थिम गूगलपेज बघायला मिळेल.










बार्बी चित्रपटाची स्टार कास्ट


बार्बी या चित्रपटात अभिनेत्री मार्गोट रॉबीनं बार्बी ही भूमिका साकारली आहे. तर केन ही भूमिका  रायन गॉस्लिंगनं साकारली आहे. या चित्रपटात सिमू लियू, केट मैकिनॉन, इस्सा राय, रिया पर्लमॅन आणि विल फेरेल हे हॉलिवूड कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'बार्बी' हा सिनेमा बार्बी आणि केनच्या अवतीभोवती फिरणारा आहे.


संबंधित बातम्या


Barbie Box Office Collection : 'I am Barbie Girl' म्हणाऱ्या 'बार्बी'ची जगभरातील सिने-रसिकांना भुरळ; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन