Share Market Closing Bell:  मागील काही ट्रेडिंग सत्रातील निराशाजनक कामगिरीनंतर, आज घसरणीला ब्रेक लागला. आज जवळपास सगळ्याच सेक्टरमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. त्यामुळे सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारला. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स 351.49 अंकांनी किंवा 0.53 टक्क्यांनी वधारत 66707.20  अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 97.70 अंकांच्या किंवा 0.50 टक्क्यांच्या तेजीसह 19778.30 वर बंद झाला. आज बाजारातील व्यवहाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजाराने आज दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ व्यवहार केला. 

एल अॅण्ड टी, आयटीसी, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सन फार्मा या कंपन्यांचे शेअर्स निफ्टीमध्ये आघाडीवर होते. बजाज फायनान्स, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा आणि अपोलो हॉस्पिटल्स आदी स्टॉक्स निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले. कॅपिटल गुड्स, एफएमसीजी आणि रियल्टीमध्ये प्रत्येकी 1 टक्क्यांनी वधारले.  बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही वधारले. 

आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 19 कंपन्याचे शेअर्स तेजीत होते. तर निफ्टीच्या 50 कंपन्यांपैकी 33 कंपन्यांचे शेअर दर वधारले. 

BSE वर आज 200 हून अधिक शेअर दरांनी 52 आठवड्यांच्या उच्चांक गाठला. यामध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, टीव्हीएस मोटर कंपनी, लार्सन अँड टुब्रो, भेल, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि सीएसबी बँक यांचा समावेश आहे.

इंडेक्‍स किती अंकावर बंददिवसभरातील उच्चांकदिवसभरातील नीचांककिती टक्के बदल
BSE Sensex66,707.2066,897.2766,431.340.53%
BSE SmallCap34,355.3334,471.9234,327.240.22%
India VIX10.4610.8610.222.10%
NIFTY Midcap 10037,050.1037,117.9036,940.950.44%
NIFTY Smallcap 10011,578.9511,607.5511,558.150.17%
NIfty smallcap 505,221.705,226.405,192.400.66%
Nifty 10019,662.0019,706.3519,600.950.49%
Nifty 20010,411.5510,434.3510,379.700.48%
Nifty 5019,778.3019,825.6019,716.700.50%

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटींची वाढ

शेअर बाजारातील आजच्या तेजीमुळे व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 303.92 लाख कोटी रुपये झाले आहे. मागील ट्रेडिंग सत्रात 301.95 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.97 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या: