Shah Rukh Khan Jawan prevue Makes Record : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) आता 'जवान' (Jawan) म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या आगामी 'जवान' सिनेमाचा प्रीव्यू आऊट करण्यात आला. प्रीव्यूला 24 तासांत 112 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 


'जवान'चा प्रीव्यू दोन दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख वेगवेगळ्या लूकमध्ये दिसून आला. तसेच नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि दीपिका पदुकोणची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान या सिनेमाने रिलीजआधीच नवा रेकॉर्ड केला आहे. 


शाहरुख खान (Shah Rukh Khan), नयनतारा (Nayanthara) आणि विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupathi) 'जवान' (Jawan) सिनेमाच्या प्रीव्यूने इतिहास रचला आहे. या प्रीव्यू व्हिडीओला 24 तासांत 100 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 






एका दिवसात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडीओमध्ये 'जवान'च्या प्रीव्यूचा समावेश झाला आहे. रेड चिलीज एन्टरटेनमेंटने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"जवान'च्या प्रीव्यूला सर्व प्लॅटफॉर्मवर 112 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहे. 'जवान'साठीचं तुमचं प्रेम असचं कायम राहुदे... सर्वांचे खूप खूप आभार".  


'जवान'चा प्रीव्यू युट्यूबवर नंबर वनवर (Jawan Prevue Video Trending Youtube)


'जवान'चा प्रीव्यू युट्यूबवर नंबर वनवर आहे. प्रीव्यू व्हिडीओ युट्यूबवर (Youtube) चांगलाच ट्रेड करतोय. युट्यूबवर या प्रीव्यूला आतापर्यंत 56 मिलियनपेक्षा अधिक वह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांसह सेलिब्रिटींनादेखील प्रीव्यू आवडत आहे. 


'जवान'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या... (Jawan Released Date Starcast)


शाहरुखचा आगामी 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. एटली कुमार दिग्दर्शित (Atlee Kumar) या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara), विजय सेतुपती (vijay sethupathi) आणि सान्या मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसेच दीपिका पदुकोण आणि थलापती विजयची झलकही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. शाहरुख आणि गौरी खानने (Gauri Khan) या सिनेमाची निर्मिती केली आहे. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : "मैं कौन हूँ, कौन नहीं...नाम तो सुना होगा"; शाहरुखच्या 'जवान'चा अ‍ॅक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट