एक्स्प्लोर

विनयभंग प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरेंचा जामीन फेटाळला तर पीडितेला धमकावल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हरही निलंबित

डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टानं फेटाळला आहे. हायकोर्टात अपील करण्यासाठी कोणताही दिलासा मोरेंना दिलेला नाही. या प्रकरणात ठाकरे यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या दिनकर साळवेंकडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडीलांना पनवेल कोर्टात धमकी दिल्याचा आरोप आहे.

मुंबई : पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टाने फेटाळला आहे.  यासंपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं डीआयजी निशिकांत मोरे यांना सेवेतून निलंबित केलं आहे. तसंच यांच्याविरोधात विनयभंग प्रकरणात एक नवी तक्रार पुढे आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी गाडीवर चालक असलेले कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांनी धमकी दिल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी केली आहे. आता साळवेला निलंबितही करण्यात आलं आहे. दरम्यान, विनयभंगाची तक्रार करणारी मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. तर दुसरीकडे डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टानं फेटाळला आहे. हायकोर्टात अपील करण्यासाठी कोणताही दिलासा मोरेंना दिलेला नाही. या प्रकरणात ठाकरे यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या दिनकर साळवेंकडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडीलांना पनवेल कोर्टात धमकी दिल्याचा आरोप आहे. 'शांत रहने का, मैं उद्धव ठाकरे का ड्रायव्हर हूं' पुण्याचे डीआयजी निशिकांत मोरेंवर त्यांच्याच मित्राच्या मुलीनं विनयभंगाचा आरोप लावला आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी ही बेपत्ता आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे ड्रायव्हर दिनकर साळवेंचा देखील सहभाग असल्याची माहिती उघड झाली होती. तक्रारदार मुलीच्या पालकांना धमकावल्याचा आरोप दिनकर साळवेंवर लावण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वी पनवेल कोर्टात निशिकांत मोरे यांच्या जामिनाची सुनावणी असताना साळवे यांनी मुलीच्या वडीलांच्या जवळ जात 'शांत रहेनेका, मैं उद्धव ठाकरे का ड्रायव्हर हूं' अशा शब्दात धमकी दिली होती. धमकी दिल्याच्या विरोधात सदर मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. अखेर साळवे यांना आज निलंबित करण्यात आले आहे. गेल्या 15 दिवसापासून काॅनस्टेबल असलेले दिनकर साळवी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत. निशिकांत मोरेला दिनकर साळवी गेल्या 15 वर्षापासून ओळखत आहे, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला दरम्यान, डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टानं फेटाळला आहे. तसेच हायकोर्टात अपील करण्यासाठी कोणताही दिलासा नाही. निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद आज पूर्ण झाला. या प्रकरणात पुढील तपासासाठी डीआयजी मोरेंची अटक आवश्यक असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं. परिचयातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरेंवर आरोप आहे. 26 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून डीआयजी मोरे फरार आहेत. पीडित मुलगीही सुसाईड नोट लिहून घरातून बेपत्ता झाल्याची कुटुंबियांची माहिती आहे. मात्र अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत गायब झाल्याचा दावा आरोपी मोरेंच्यावतीनं कोर्टात करण्यात आला आहे. मोरे यांच्या पत्नीसोबत पीडितेच्या कुटुंबियांचे आर्थिक व्यवहार फिसकटल्यानं मोरेंविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मोरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पीडितेचे कुटुंबिय जामिनावर बाहेर आहे. काय आहे प्रकरण
5 जून 2019 रोजी निशिकांत मोरे हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी तिच्या वाढदिवासानिमित्त जमले होते. त्यावेळी केक कापण्याच्या घटनेवरून मोरेंवर हा विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी 26  डिसेंबर रोजी नवी मुंबईतील तळोजा पोलीस स्थानकांत पुणे पोलिसांच्या परिवहन शाखेत डिआयजी असलेल्या निशिकांत मोरेंविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस-याच दिवशी अल्पवयीन पीडित मुलगी सुसाईड नोट लिहून तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिनं मोरेंच्या त्रासाला कंटाळून जीव द्यायला जात असल्याचा उल्लेख केला आहे. पोलिसांची पाच विशेष पथकं सध्या मुलीचा सर्वत्र शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 September 2026: आज पोळा, पिठोरी अमावस्येचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग बनले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज पोळा, पिठोरी अमावस्येचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग बनले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
ठाण्यात शिवसेनेला धक्का! नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचं पद रिक्त, निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष 
ठाण्यात शिवसेनेला धक्का! नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचं पद रिक्त, निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष 
MPSC Exam : एमपीएससीचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
MPSCचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget