Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने भाजपकडून डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ही जागा काँग्रेसला (Congress) सुटली आहे. काँग्रेसकडून या जागेवर अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र आता या मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांचे नाव चर्चेत आले आहे. 


काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेस (Bharat Jodo Nyay Yatra) धुळे जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला होता. काँग्रेसतर्फे या यात्रेचा लाभ निवडणुकीत उठविण्यासाठी उमेदवार जाहीर करुन प्रचाराला सुरुवात होईल, असे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसला अजूनही योग्य उमेदवार सापडलेला नाही. तर भाजप आणि वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार धुळे लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर झाले आहे. 


डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव आघाडीवर


खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण होत आली आहेत. मात्र अजूनही त्यांच्याविरोधात धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला तोडीस तोड उमेदवार मिळालेला नाही. याआधी काँग्रेसकडून धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि डॉ. तुषार शेवाळे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र आता माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव आघाडीवर आले आहे. 


...म्हणून धुळ्यासाठी डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावाची चर्चा 


धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून त्यात नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आहेत. उमेदवारी देताना आतापर्यंत धुळे जिल्ह्यातीलच मतदारसंघांचा विचार करण्यात आला असला तरी या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांचा विचार केल्यास तीन मतदारसंघांची साथ काँग्रेस उमेदवाराला मिळू शकेल, असा आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून नाशिक जिल्ह्यातील डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. 


धुळ्यात एमआयएमची ताकद


दरम्यान, एमआयएमची धुळे लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असल्याने एमआयएम धुळ्याच्या निवडणुकीत उतरणार असे बोलले जात आहे. धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना आजपर्यंत रंगला. मात्र भाजप आणि काँग्रेस यांना समान विरोध करीत मुस्लीम समाजाला एकत्र करून वेगळे राजकारण करणारा एमआयएम पक्ष राष्ट्रीय राजकारणासह महाराष्ट्रातही लक्षवेधी ठरला आहे. एमआयएमने मुस्लीम बहुल मतदार संघांमध्ये ताकद निर्माण केली आहे. आता धुळ्यातून एमआयएम नक्की कुणाला उमेदवारी देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


Dhule Loksabha : ...तर सुभाष भामरेंचा टॅक्सी ड्रायव्हरही पराभव करेल, लोकसंग्रामचा जोरदार हल्लाबोल, धुळ्यात मविआला पाठींबा जाहीर