Dhule News धुळे : स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Abhiyan) योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला बारा हजार रुपये प्रमाणे शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळत असते. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे ग्रामपंचायत (Shewale Gram Panchayat) येथे शौचालय बांधण्यासाठी मिळत असलेले अनुदान लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेवाळे येथील ग्रामस्थांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची (Corruption) सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. 


स्वच्छ भारत योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता शासनाकडून प्रत्येकी लाभार्थ्याला बारा हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळत असते, मात्र शेवाळे ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा निधी पोहोचला नाही. याउलट एका लाभार्थ्यांच्या नावे चार चार प्रकरणे टाकून लाखो रुपयांचा निधी लाटण्यात आला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी


शेवाळे गावातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे की, स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत शौचालय बांधून देण्यासंदर्भात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ज्या लोकांनी लाभार्थ्यांचे पैसे वाटले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शासनाचा लाटलेला पैसा परत मिळवावा. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे


दोषी आढळले तर कारवाई होणार


यानंतर विस्तार अधिकारी कपिल वाघ यांनी ग्रामपंचायत शेवाळे येथे भेट देऊन आपण याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पथक तयार करणार असून, प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाऊन कुठल्या लाभार्थ्याला शौचालय मंजूर झाले आहे व त्याला त्याचा लाभ मिळाला नाही याची चौकशी करणार आहे. याप्रकरणी दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


काय आहे स्वच्छ भारत अभियान


स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने सुरू केलेले राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे. याचा उद्देश रस्ते, रस्ते आणि पायाभूत सुविधा स्वच्छ ठेवणे आणि कचरा स्वच्छ ठेवणे हे आहे. ही मोहीम 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आली. वैयक्तिक, क्लस्टर आणि सामुदायिक शौचालये बांधून उघड्यावर शौचास जाण्याची समस्या कमी करणे किंवा दूर करणे हे स्वच्छ भारताचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्याला बारा हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळते.


इतर महत्वाच्या बातम्या


Dhule News : कॅफेवर सुरु होते नको ते प्रकार, पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, धाड टाकत आठ तरुण-तरुणींना घेतलं ताब्यात


बळीराजा हवालदिल! धुळ्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, पिकांचं मोठं नुकसान