Dhule News धुळे : महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी तयार केलेल्या कॅफेवर पोलिसांनी (Police) धाड टाकली असून. महाविद्यालयातील आठ तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच कॅफे (Cafe) मालकाची देखील चौकशी करण्यात येत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे शहराच्या देवपूर (Deopur) परिसरातील स्वामी नारायण मंदिर रोड वरील एका प्रसिध्द असलेल्या कॅफेच्या वरच्या मजल्यावर तरूण तरूणी एकांतात दिलखुलासपणे अश्लील चाळे करत असल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील (Dhananjay Patil) यांना मिळाली. 


आठ तरुण-तरुणींना पोलिसांकडून समज


या माहितीच्या आधारे देवपुर पोलीस ठाण्याचे (Deopur Police Station) पथक कॅफेवर जावून धडकले. या कॅफेची झडती घेतली जात असताना तेथे आठ तरुण तरुणी आढळून आल्याचे समजते. त्यांची हजेरी घेत त्यांना समज देण्यात आली. पालकांनाही बोलवून समज दिल्याचे कळते. याप्रकरणी कॅफे चालकाविरुध्द कारवाई होणार आहे. कॅफेमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.


यांनी केली कारवाई


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. पीएसआय सुनिल वसावे, पीएसआय तळेकर पीएसआय इंदवे, एएसआय मिलिंद सोनवणे, हे.कॉ. पंकज चव्हाण, पो.ना. राहुल गुंजाळ, लता पाटील, मनीषा बांगड, राजेंद्र हिवरकर, मोहिनी माळी आदींच्या पथकाने केली.


मागील महिन्यात करवंद रस्त्यावरील कॅफेवर छापा


फेब्रुवारीत करवंद रस्त्यावरील रोज कॅफेवर शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाने छापा टाकत अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाला ताब्यात घेतले. कॅफेमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कॅफेवर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. दामिनी पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक छाया पाटील यांना रोज कॅफेमधील प्रकाराबाबत माहिती मिळाली होती. त्यांच्यासह शिपाई रोशनी पाटील व सहकाऱ्यांनी रोज कॅफेवर छापा टाकला. तेथे एका कप्प्यात युवक-युवती अश्लील चाळे करीत असल्याचे आढळले. त्यांना छाया पाटील यांनी समज देऊन सोडून दिले. कॅफेमालक तुषार प्रभाकर बारी (25, रा. आदर्शनगर, शिरपूर) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या


भाजपाच्या युवा नेत्यांकडून विखे पाटलांना घरचा आहेर, विवेक कोल्हेंच्या नेतृत्वात शिर्डीत मोर्चा


अनैतिक संबधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला, दिल्लीतील गुंडांना 30 लाखांची सुपारी देऊन संपवलं